शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

नागपूरच्या आकाशातून दररोज ये-जा करतात १३५५ आंतरराष्ट्रीय विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दक्षिण-पूर्व आशियन विमानतळ ते युरोपियन देश आणि पूर्व आशियन देश ते मध्य-पूर्व देशांमध्ये दररोज १३५५ आंतरराष्ट्रीय विमानांची आकाशातून ये-जा सुरू असते. या सर्व विमानांचे नियंत्रण नागपूर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातर्फे (एटीसी) आधुनिक उपकरणांद्वारे करण्यात येते. एटीसीमध्ये जागतिक दर्जाची परिवहन आणि पाळत ठेवणारी यंत्रणा बसविण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे‘एटीसी’ कक्षात जागतिक दर्जाची उपकरणे : देशातील पहिले विमानतळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दक्षिण-पूर्व आशियन विमानतळ ते युरोपियन देश आणि पूर्व आशियन देश ते मध्य-पूर्व देशांमध्ये दररोज १३५५ आंतरराष्ट्रीय विमानांची आकाशातून ये-जा सुरू असते. या सर्व विमानांचे नियंत्रण नागपूर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातर्फे (एटीसी) आधुनिक उपकरणांद्वारे करण्यात येते. एटीसीमध्ये जागतिक दर्जाची परिवहन आणि पाळत ठेवणारी यंत्रणा बसविण्यात आली आहेत.सकाळी ७ ते ८ या वेळात ९३ विमानांची ये-जाभारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एटीएमचे महाव्यवस्थापक आणि समन्वयक प्रमुख युधिष्ठिर शाहू यांनी सांगितले की, देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर विमानतळाच्या आकाशातून वर्ष २०१६ मध्ये १०६२ विमाने, २०१७ मध्ये १२५० आणि वर्ष २०१८ मध्ये १३५५ आंतरराष्ट्रीय विमानांचे संचालन व नियंत्रण करण्यात येते. सकाळी ७ ते ८ या वेळेत ९३ विमानांची आकाशातून ये-जा होते. ही संख्या दरवर्षी वाढत आहे. याकरिता एकूण १०२ हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी (महिला व पुरुष) २४ बाय ७ या विमानांवर लक्ष ठेवून असतात. विमानतळाचा हवाई वाहतूक सर्व्हिस एरिया हा ३.१ लाख चौरस कि.मी. एवढा आहे. एटीसी कक्षातर्फे दिल्ली ते दक्षिण भारत आणि मुंबई-कोलकाता हवाई मार्गाचे सुरळीत संचालन करते.नागपुरातून ७२ घरगुती विमानाचे उड्डाणनागपूर विमानतळावरून दररोज ७२ घरगुती विमानांची ये-जा सकाळी ६ ते रात्री १० या वेळात सुरू असते. विमानतळाची क्षमता ५०० विमानांची आहे. काही वर्षांत संख्या वाढली आहे. नागपुरातून प्रवासी, कार्गो, वैद्यकीय आणि मेन्टेनन्स विमानांची ये-जा असते. त्यात दोन आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे. विमानतळाच्या खासगीकरणानंतर नवीन कंपनी नवीन कार्गो धावपट्टी आणि विकास कामे करणार आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे घरगुती विमानांची संख्या निश्चितच वाढेल. 

इमारतींसाठी प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यकविमानतळापासून २० कि़मी. सभोवताल उंच इमारती बांधण्यासाठी शासन एक खिडकी योजना तयार करीत आहे. संबंधित शहराच्या सर्व विभागाचा सॉफ्टवेअरमध्ये समावेश करण्यात येणार आहे. ही यंत्रणा मुंबई आणि दिल्ली येथे सुरू झाली असून नागपुरातही लवकरच सुरू होणार आहे. त्याकरिता भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी आवश्यक राहील. त्यामुळे विमानतळाच्या सभोवताल उंच इमारत उभारण्यावर निर्बंध येणार आहे.१ डिसेंबरपासून ड्रोनकरिता आॅनलाईन परवानगी बंधनकारकदेशाच्या सर्व भागात ड्रोनचे संचालन अवैधरीत्या करण्यात येते. कोणत्याही कंपनीने ‘डीजीसीए’कडे ड्रोनची नोंदणी केलेली नाही. पण आता विनापरवानगी ड्रोन आकाशात उडविता येणार नाहीत. याकरिता ‘डीजीसीए’ मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत आहेत. त्याअंतर्गत १ डिसेंबरपासून ड्रोनकरिता आॅनलाईन परवानगी बंधनकारक होणार आहे. जी कंपनी ड्रोन विकते त्यांनाच नोंदणी करावी लागणार आहे. याकरिता नागरी वाहतूक मंत्रालयातर्फे अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. त्याद्वारे परवानगी घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी राहणार आहे. तसे पाहता सध्याच्या नियमानुसारही ड्रोन आकाशात उडविता येत नाहीत. आकाशात बलून सोडणाऱ्यांनाही परवानगी बंधनकारक आहे.हेलिकॉप्टरसाठी विशेष व्यवस्थापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये विशेष अतिथींच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या संचालनाला त्रास होणार नाही.आज आंतरराष्ट्रीय एटीसी दिनएअर ट्रॉफिक कंट्रोलर्स असोसिएशनच्या या जागतिक दर्जाच्या संघटनेतर्फे २० आॅक्टोबर हा आंतरराष्ट्रीय एटीसी (एअर ट्रॉफिक कंट्रोलर्स) दिन पाळण्यात येतो. हा दिवस नागपूर एटीसीमध्ये साजरा करण्यात येणार आहे. एटीसीमध्ये काम करणाऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. हवाई वाहतूक सुरक्षित करण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो. भारत सरकारची ओपन स्कॉय पॉलिसी आणि उड्डाण (उडे देश का आम नागरिक) योजनेमुळे देशातील एअर ट्रॉफिक कंट्रोलर्सला अधिक दक्ष राहावे लागेल.सामाजिक कार्यात विमानतळाचा सहभागनागपूर विमानतळाचा सामाजिक कार्यातही सहभाग आहे. पालकत्व हरविलेल्यांना विमानांची सैर घडवून आणण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी श्रद्धानंद अनाथालयातील ६० मुलामुलीनी एक दिवस विमानतळ आणि एटीसीमध्ये घालविला. त्यांना अधिकाऱ्यांनी विमानांचे उड्डाण आणि संचालनाची सर्व माहिती दिली.या प्रसंगी सहमहाव्यवस्थापक (सीआयसी) रोशन कांबळे, सहमहाव्यवस्थापक (सीएनएस) पी.पी. निखार, सहायक महाव्यवस्थापक (एटीसी) रवी खुशवाह, व्यवस्थापक (एटीसी) गौरव राठोड आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर