शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:41 IST

कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान अद्याप भरून निघाले नाही. असे असले तरी, गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नाही. अलीकडच्या एका अवैध गुणवाढ प्रकरणामुळे नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे असण्याचा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाला संशय : अवैध गुणवाढ प्रकरणाची व्यापक दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान अद्याप भरून निघाले नाही. असे असले तरी, गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नाही. अलीकडच्या एका अवैध गुणवाढ प्रकरणामुळे नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे असण्याचा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आला आहे. परिणामी, न्यायालयाने प्रकरणाची व्यापक दखल घेतली आहे. अवैध गुणवाढ प्रकरणांवरील निर्णयांची माहिती नागपूर विद्यापीठाला मागण्यात आली आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण जनहित याचिका म्हणून चालवायचे की नाही याचा विचार उच्च न्यायालय करणार आहे.अवैध गुणवाढीचे अलीकडचे प्रकरण करण हांडा या विद्यार्थ्याशी संबंधित आहे. याप्रकरणात बडतर्फ झालेल्या सहायक कुलसचिव (पुनर्मूल्यांकन) संध्या चुनोडकर-हांडा यांचा करण हा चिरंजिव होय. सेंट विन्सेन्ट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकी (मेकॅनिकल) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या करणने २०११ मधील हिवाळ्यात तृतीय सेमिस्टरची परीक्षा दिली होती. त्यात तो अनुत्तीर्ण झाला होता. त्यामुळे त्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला होता. पुनर्मूल्यांकनात गुण वाढल्यामुळे तो उत्तीर्ण झाला. दरम्यान, मुन्ना पटेल यांनी ही गुणवाढ बेकायदेशीरपणे झाल्याची तक्रार तत्कालीन कुलगुरूंकडे केली. कुलगुरूंनी त्याची दखल घेऊन शिस्तपालन समितीला चौकशी करण्याचा आदेश दिला. समितीने चौकशी करून २७ सप्टेंबर २०१३ रोजी अहवाल सादर केला. त्यात संध्या चुनोडकर यांनी करणचे गुण बेकायदेशीरपणे वाढविल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच, चुनोडकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व करणचा तृतीय सेमिस्टरचा निकाल रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती.२ नोव्हेंबर २०१३ रोजी विद्यापीठाने करणचा तृतीय सेमिस्टरचा निकाल रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याविरुद्ध करणने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याची याचिका अंशत: मंजूर केली. त्यानंतर विद्यापीठाने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी सुधारित निर्णय घेऊन करणला नव्याने तृतीय सेमिस्टरची परीक्षा देण्यास सांगितले आहे. त्या निर्णयालाही करणने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परिणामी, न्यायालयाने याप्रकरणाची व्यापक दखल घेतली आहे. तसेच, करणच्या तक्रारीवर विद्यापीठाला १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले आहे. करणतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :universityविद्यापीठHigh Courtउच्च न्यायालय