शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

- तर दोन लाख रुपये दावा खर्च बसवला जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:56 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे प्रदान पीएच.डी पदवीला मान्यता नाकारण्यावर दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध आढळून आल्यास दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त दावाखर्च बसवला जाईल अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाला दिली.

ठळक मुद्देहायकोर्ट : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाला तंबी

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे प्रदान पीएच.डी पदवीला मान्यता नाकारण्यावर दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध आढळून आल्यास दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त दावाखर्च बसवला जाईल अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाला दिली.सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांचे निर्णय विचारात घेऊन संबंधित मुद्यावर आठ आठवड्यात निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने ५ जून २०१८ रोजी मंडळाला दिला होता. परंतु, मंडळाने अद्याप त्यानुसार निर्णय घेऊन न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. हे प्रकरण गेल्या आठवड्यात सुनावणीसाठी आले असता मंडळाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ वाढवून देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांनी मंडळाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी एक ऐवजी दोन आठवडे वेळ दिला. तसेच, त्यासोबत वरीलप्रमाणे तंबीही दिली. प्रकरणावर आता २५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल.सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या निर्णयानुसार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने २००९ पूर्वी प्रदान केलेल्या पीएच. डी. पदवीला मान्यता नाकारता येत नाही. परंतु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. वचनदास बडोले यांची पीएच. डी. पदवी अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बडोले दिव्यांग असून त्यांनी प्राध्यापकपदी बढती मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. परंतु, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पीएच. डी. पदवी मिळविली असल्याचे कारण सांगून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. या निर्णयावर बडोले यांचा आक्षेप आहे. १९९८ व २००६ मधील शासन निर्णयाद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा समावेश आहे. या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे. तसेच, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायद्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला कृषी विषयात पदवी प्रदान करण्याचा अधिकार दिला आहे असे बडोले यांचे म्हणणे आहे. बडोले यांच्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयagricultureशेतीuniversityविद्यापीठ