शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

-तर रेशन दुकानदाराचा परवाना होणार रद्द : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:31 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने नागरिकांना ३ महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांकडे मुबलक धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जे दुकानदार धान्य वाटप करणार नाहीत, स्टॉक नाही, अशी कारणे सांगतील त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देरेशनधारकांना मिळणार ३ महिन्याचे धान्य

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने नागरिकांना ३ महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांकडे मुबलक धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जे दुकानदार धान्य वाटप करणार नाहीत, स्टॉक नाही, अशी कारणे सांगतील त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.याशिवाय शिधापत्रिकाधारकांना आता बोटाचे ठसे देण्याची गरज पडणार नाही. १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. सर्व आस्थापना बंद असल्याने गरिबांच्या हातात पैसा राहणार नाही, म्हणून गरिबांच्या बँक खात्यामध्ये सरकार पैसा टाकणार असल्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्याची जवळपास १२०० वर दुकाने असून, ७ लाखांवर कार्डधारक आहेत. तर ३० लाखांवर लाभार्थी आहेत. पूर्वी रेशनची दुकाने ही काही ठराविक वेळेसाठीच उघडी राहत होती. मात्र आता या काळामध्ये ही दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेमध्ये खुली राहणार आहेत. ग्राहकांना तीन महिन्याचा धान्य पुरवठा होणार असल्याने दुकानदारांनाही शासनाकडे तीन महिन्याचे चालान भरावे लागणार आहे. ज्या दुकानदारांकडे तीन महिन्याचे चालान भरण्याइतके पैसे नसतील, त्यांना शासनाकडून क्रेडिट मिळणार आहे. यानंतर पुढील महिन्यात सदरचे पैसे त्यांच्याकडून समायोजित केले जाणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शासनाकडून धान्य दुकानांमध्ये रेशनचा पुरवठा करण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये रेशन वितरणालाही सुरुवात झाली आहे. तर शहरी भागामध्ये येत्या १ एप्रिलपासून धान्य वितरणाला सुरुवात होणार आहे.असे मिळणार रेशनप्रत्येक रेशनकार्ड धारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने, तांदूळ ३ रुपये किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो मिळणार आहेत. तर तूरडाळ ५५ रुपये किलो प्रमाणे १ किलो, तर साखर २० रुपये दराने १ किलो वितरण होणार आहे. शहरातील व ग्रामीण भागातील जवळपास सर्वच रेशन दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. दुकानदारांनी ग्राहकांना तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी द्यावयाचे आहे. जो दुकानदार धान्य देण्यास नकार देणार अशांचा परवानाही रद्द करण्यात येईल.भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार