शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

..तर ईशान्येतील राज्यांचीही काश्मीरसारखीच स्थिती असती : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:05 IST

आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते भारतासोबत खंबीर आहेत. याचे श्रेय तेथे जाऊन तेथील लोकांशी एकरूप झालेल्या व्यक्तींनाच जात असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देम्हणून ते चीनच्या सीमेवर भारत समर्थनार्थ घोषणा देतात

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ईशान्येकडील राज्य भारतासोबत राहतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत असे. आसाम, अरुणाचल प्रदेशमधील स्थिती काश्मीरसारखी तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जायची. मात्र ५० वर्षांअगोदर काही लोक सेवाभाव घेऊन तेथे गेले. त्यामुळे आत्मियता व जिव्हाळा वाढीस लागला. आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते भारतासोबत खंबीर आहेत. याचे श्रेय तेथे जाऊन तेथील लोकांशी एकरूप झालेल्या व्यक्तींनाच जात असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नंदकुमार जोशी यांच्या शुभारंभ या पुस्तकाचे सरसंघचालकांच्या मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.रामनगरातील शक्तिपीठ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध साहित्यिक शुभांगी भडभडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. अरुणाचल प्रदेश हे शुद्ध भारतीय नाव असून तो प्रदेश आपला आहे. परंतु, चीन वेळोवेळी त्यावर आपला दावा ठोकण्यासाठी तिथल्या लोकांना प्रलोभने दाखवित असतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जागरूक लोक राहतात असा समज आहे. परंतु, ज्यावेळी ईशान्येकडील राज्यांचे लोक दिल्लीला येतात त्यावेळी त्यांना तुम्ही चीनमधून आलात का, असे विचारले जाते. आपण क्षणभर विचार केला पाहिजे की, असल्या प्रश्नामुळे ईशान्येकडील लोकांना काय वाटत असेल. परस्परांशी असलेला संपर्काचा अभाव हे भारतातील बहुतांश समस्यांचे मूळ आहे, असे डॉ.भागवत म्हणाले. अरूणाचलसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सोईसुविधांचा अभाव आहे. तिथले लोक मागास असून कुत्रे-मांजर खातात, असे म्हटले जाते. परंतु, त्यांच्या वाट्याला आलेले जीवन आणि परिस्थिती हा त्यांचा नव्हे आपला दोष आहे. विकासचक्रात त्यांचे मागे राहणे याला देशातील इतर भागात राहणारे लोक जबाबदार असल्याचे डॉ. भागवत म्हणाले. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक नंदकुमार जोशी यांनी अरुणाचल प्रदेशातील वास्तव्याचे अनुभव मांडले. प्रसाद बर्वे यांनी संचालन केले.‘तेथील’ क्रांतिकारकांची नावे अभ्यासक्रमात नाहीतयावेळी सरसंघचालकांनी ईशान्येतील राज्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंती व्यक्त केली. पारतंत्र्याच्या काळात देशाच्या इतर भागाप्रमाणे पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील स्वातंत्र्यासाठी आंदोलने व संघर्ष झाला. परंतु, तेथील क्रांतिकारकांची नावे, कर्तृत्व आणि कथा त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहिल्यात. आम्हाला त्या अभ्यासक्रमात कधीच शिकवल्या नाहीत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर