शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

-तर मग वाघ बघणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 11:04 IST

राष्ट्रीय वाघ अभयारण्य, चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह दीक्षाभूमी, ताजबाग, ड्रॅगन टेम्पल आदी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देजास्त दरानंतरही मिळत नाहीत हॉटेलात खोल्याऑनलाईन बुकिंगकंपन्यांसोबत करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळी आणि विधानसभा निवडणुकानंतर आता थंडीचा मोसम सुरू झाल्याने, देशाची ‘टायगर कॅपिटल’ असलेल्या नागपुरात पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत आहेत. राष्ट्रीय वाघ अभयारण्य, चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह दीक्षाभूमी, ताजबाग, ड्रॅगन टेम्पल आदी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. हॉटेल्सच्या काऊंटरवरूनच त्यांना परतावे लागत आहे. अखेर असे का होत आहे, याची पडताळणी लोकमतने केली आहे. यामध्ये काही रोचक तथ्य पुढे आले आहे.नागपुरात किती रेसिडेन्सियल आणि किती स्टार वर्गवारीचे हॉटेल्स आहेत, हे माहीत असणे आवश्यक आहे. प्राप्त माहितीनुसार नागपुरात नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन आहे. नागपुरातील जवळपास ९३ हॉटेल्स या असोसिएशनचे सदस्य आहे. पण खरी बाब अशी की, नागपुरात यापेक्षा जास्त रेसिडेन्सियल हॉटेल्स आहेत. यामध्ये गेस्ट हाऊस आणि सर्व्हिस अपार्टमेंटचा समावेश आहे. यातील बहुतांश हॉटेल्स नोंदणीकृत नसल्यामुळे ते आताही प्रशासनाच्या यादीत नाहीत. नागपुरात तीन ते पाच स्टार वर्गवारीतील हॉटेल्स आहेत. यामध्ये हॉटेल रेडिसन ब्ल्यू, ली मेरिडियन, सेंटर पॉर्इंट या हॉटेल्सचा समावेश आहे. या दिवसात पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या उपलब्ध का नाही, यावर चर्चा करणे आवश्यक आहे. यासंदर्भात माहिती देताना या क्षेत्रातील मान्यवरांनी सांगितले की, नीरी संस्थानमध्ये या दिवसात कॉन्फरन्स होते. यामध्ये देश-विदेशातील प्रतिनिधी येतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था हॉॅटेल्समध्ये करण्यात येते. तसेच या दिवसात दुसऱ्या शहरांमध्येही मोठी कॉन्फरन्स सुरू आहे. १० नोव्हेंबरला भारत-बांगला देशमध्ये जामठा येथे टी-२० क्रिकेट सामना आहे. राष्ट्रीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोव्हिजन २२ ते २५ नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.या सर्व आयोजनामुळे हॉटेल्समध्ये प्री-बुकिंग असल्यामुळे या दिवसात पर्यटकांना आणि अन्य नागरिकांना जास्त दरातही खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. खोल्या न मिळण्याचे दुसरे कारण असे की, अनेक हॉटेल्सच्या संचालकांनी खासगी कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यामुळे संचालकांना संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना खोल्या प्रारंभी उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्यामुळे अनेक हॉटेल्समधील बहुतांश खोल्या पूर्वीच बुक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच पर्यटकांचा नागपूरकडे ओढा बघता देशातील ऑनलाईन कंपन्यांकडून बुक पर्यटक खोल्या बुक करीत आहेत, तर वेळेवर नागपुरात आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा येत आहे.

नागपुरात विविध इव्हेंटसाठी हॉटेल्समध्ये खोल्यांची प्री-बुकिंग होते. त्याचा परिणाम खोल्यांच्या उपलब्धतेवर होतो. विविध हॉटेल्सतर्फे खासगी कंपन्यांशी बिझनेस करार केल्यामुळे खासगी कंपन्यांच्या पोर्टलवर ऑनलाईन खोल्या उपलब्ध होतात. त्यामुळे हॉटेल्सच्या काऊंटरवर लोकांना खोल्या मिळत नाही. अशी स्थिती शहरातील सर्व हॉटेल्समध्ये दिसून येत आहे.- तेजिंदरसिंह रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.

टॅग्स :Tigerवाघ