शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

...तर पूर्ण परिसर सील होणार : मनपा आयुक्तांनी काढले आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 21:41 IST

Municipal Commissioner orders issued कोरोनाचा वाढता प्रकोप थांबविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. पूर्वीप्रमाणेच आता हळहळू प्रतिबंध लावले जाणार असून, पाचपेक्षा अधिक काेरोनाचे रुग्ण आढळून आल्यास संबंधित इमारत व फ्लॅट, स्कीम प्रतिबंधित करण्यात येईल. तसेच २०पेक्षा अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या परिसरातील रस्ता आणि परिसर सील करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी शुक्रवारी काढले आहेत.

ठळक मुद्दे५ रुग्ण आढळल्यास इमारत व फ्लॅट स्कीम२० रुग्ण आढळल्यास रस्ता अन् परिसर प्रतिबंधित घोषित होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप थांबविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. पूर्वीप्रमाणेच आता हळहळू प्रतिबंध लावले जाणार असून, पाचपेक्षा अधिक काेरोनाचे रुग्ण आढळून आल्यास संबंधित इमारत व फ्लॅट, स्कीम प्रतिबंधित करण्यात येईल. तसेच २०पेक्षा अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या परिसरातील रस्ता आणि परिसर सील करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी शुक्रवारी काढले आहेत. यासंदर्भात संबंधित सहायक आयुक्त व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार अंत्यसंस्काराकरिता २०पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. अंत्यसंस्काराकरिता उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. ज्या कोरोनाबाधित रुग्णांना होम क्वाॅरंटाइन, आयसोलेशन करण्यात आले, त्या रुग्णांनी घराबाहेर निघू नये, तसेच क्वाॅरंटाइनविषयक नियमांचे पालन करावे, संबंधित सहायक आयुक्त, झोनल वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधितांचे डाव्या हातावर होम क्वाॅरंटाइनचे शिक्के मारण्याबाबत आवश्यक कार्यवाही आपल्या अधिनस्थ यंत्रणेमार्फत करावी. रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह हे एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवावे. त्यासंबंधी शर्तीचे काटेकोर पालन व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व आदेशाच्या अंमलबजावणीचे अधिकार संबंधित सहायक आयुक्त व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

नागरिकांवरही कडक दंडात्मक कारवाई

परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. नियमांचे पाालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत, गर्दी करतील, नियमांचे उल्लंघन करतील त्या सर्व नागरिकांवर कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेशही मनपा आयुक्तांनी बजावलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRadhakrishnan. Bराधाकृष्णन बी.