शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

-तर सिमेंट रस्त्याचे कंत्राट रद्द करा! महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 20:30 IST

काम करण्याची क्षमता आहे की नाही याची शहानिशा करूनच नवीन कंत्राट द्या, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी लोककर्म विभागाच्या बैठकीत दिले.

ठळक मुद्देपरवानगीशिवाय रस्ता खोदणाऱ्यांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात सिमेंट रस्त्यांसोबतच विविध विकासकामे सुरू आहेत. ज्याची क्षमता नाही अशा कंत्राटदारांनी अनेक कामे घेतली आहेत. दोन वर्षापूर्वी कार्यादेश मिळालेले कार्य अद्यापही सुरू झाले नाहीत, ही गंभीर बाब आहे. अशा कंत्राटदाराकडून शपथपत्र घ्या. नसेल देत तर तातडीने कंत्राट रद्द करा, यापुढे काम देताना संबंधित कंत्राटदाराकडे किती कामे आहेत. त्याची काम करण्याची क्षमता आहे की नाही याची शहानिशा करूनच नवीन कंत्राट द्या, असे निर्देश महापौरसंदीप जोशी यांनी शनिवारी लोककर्म विभागाच्या बैठकीत दिले.शहरातील फूटपाथ, सिमेंट रस्त्यांची गुणवत्ता, चोक झालेल्या ड्रेनेज लाईन, क्षमतेपेक्षा अधिक काम घेणाऱ्या कंत्राटदारामुळे काम पूर्णत्वाला लागणारा विलंब आणि घसरलेली गुणवत्ता या विषयांच्या अनुषंगाने महापालिका मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, राजेश भुते, सोनाली चव्हाण, अमीन अख्तर, महादेश मेश्राम, धनंजय मेंढुलकर उपस्थित होते.परवानगीशिवाय रस्ता खोदला तर कारवाईमहापालिकेने कुठे नवा रस्ता बनविला तर तो खणण्यासाठी शहरात कार्यरत एजन्सीज सज्ज असतात की काय, असे आता वाटू लागले आहे. अनेक एजन्सीज परवानगी न घेता रस्ता खोदतात. काम केल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नाही. शहरात कार्य करणाºया अन्य विभागांनी यापुढे नागपूर महापालिकेसोबत समन्वय ठेवायलाच हवा. मनपाच्या मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय जर यापुढे शहरातील रस्ते कुठल्या एजन्सीने खणले तर कारवाई केली जाईल, असा इशारा संदीप जोशी यांनी दिला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMayorमहापौरSandip Joshiसंदीप जोशी