शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

...तर नगरसेवकांवर होईल कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:06 IST

ज्या नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आला आहे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देआरोग्य सभापतींचा दावा : तपासणीत आढळला डासांचा लार्वा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आला आहे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली असता, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे यांच्यासह भाजपा नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आल्याचा आरोप आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने महापौर नंदा जिचकार यांच्या बैठकीत केला होता. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली होती.मधुमेहावर व्याख्यान कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला मनोज चाफले उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात चाफले म्हणाले, डेंग्यू व स्क्रब टायफस नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. डेंग्यूवर विशेष औषध नाही. मात्र स्क्रब टायफसवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा साठा आहे. डासांचा लार्वा आढळून आल्यास नोटीस बजावली जाते. एखाद्या नगरसेवकाच्या घरात लार्वा आढळून आल्यास सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनाही नोटीस बजावली जाते. पावसाने सात ते आठ दिवसांची उघाड दिली की लार्वा डास बनतात. लोकांना जागृत करण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. दंड आकारण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका