शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

'त्यांची' हत्या एकाच मंतरलेल्या पिस्तुलाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:14 IST

महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असल्यायाची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. महागाई व कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील चर्चेत बोलतांना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर  हल्ला बोल केला.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असल्यायाची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. महागाई व कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील चर्चेत बोलतांना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर  हल्ला बोल केला.ते म्हणाले, एका विशिष्ट कट्टरवादी विचारांनी प्रेरित काही संघटना राज्यात आणि देशात कार्यरत आहेत. देशभरात सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या करण्यात आली. ती हत्या एका विचारांनी भारावलेल्या लोकांनी आणि मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने करण्यात आल्याचे आता तपासात उघड होत आहे. या चौघांच्याही शरीरावर झाडण्यात आलेल्या गोळ्या एकाच पद्धतीच्या असल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भातखळकर यांच्यात खडाजंगीएका विशिष्ठ विचारांच्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात केली गेली होती. त्यावर अजूनही निर्णय प्रलंबित असून त्या संस्थेवर आता बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चव्हान यांच्या भाषणावर हरकत घेत तत्कालीन यूपीए सरकारनेच सनातन संस्थेच्या बंदीचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे सांगितले. यावर चव्हाण यांनी हा प्रस्ताव अद्यापही फेटाळण्यात आला नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी एकीकडे भाजप आमदार तर दुसरीकडे काँग्रेस आमदारानी गदारोळ घालत वेलमध्ये येण्याचा प्रयत्न केला .कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सूत्रधार मोकाटकोरेगाव भीमाची दंगल ही पूर्व नियोजित असल्याचे म्हटले आहे. या दंगलीला जबाबदार असलेल्या व्यक्तींना खऱ्या अथार्ने अटक होणे गरजेचे होते. मात्र, तो मोकाट आहे. राज्यात त्या व्यक्तीचा सत्कार होत आहे. भाषणे होत आहे. तेव्हा त्याला सरकारचा राजाश्रय आहे, असे का समजू नये, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.अहमदाबादचे महत्त्व वााढवण्यासाठी बुलेट ट्रेनपंतप्रधानांनी केवळ अहमदाबादचे महत्व वाढवण्यासाठीच बुलेट ट्रेन आणली आहे. यामुळे महाराष्ट्राला कुठलाही फायदा होणार नाही. ७० टक्के ही रेल्वे गुजरातमध्ये आहे. तेव्हा महाराष्ट्राने अर्धा निधी काा द्यावा, असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण