.......
कोराडी येथून अल्पवयीन गायब
नागपूर : कोराडी परिसरातून शनिवारी एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. सकाळी घरात मुलगी दिसली नसल्याने तिचा शोध घेतला गेला. काहीच पत्ता लागत नसल्याचे बघून नातेवाईकांनी कोराडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपहरणाचे प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे.
...........
पोलिसांनी पकडली १५ हजारांची दारू
नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी दोन अवैध दारू अड्ड्यांवर छापा घालून १५ हजार रुपयांची दारू पकडली आहे. पोलिसांनी धम्मदीपनगर आणि कुंदनलाल गुप्तानगर मध्ये कारवाई करत आरोपी राजू निमजे व श्याम धकाते यांच्या अड्ड्यावर छापा घातला. पोलिसांनी ६५ लिटर मोहाची दारू व धकातेच्या अड्ड्यावरून देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. ही कारवाई ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात एएसआय प्रकाश काळे, अक्षय सोरदे, मधुकर, रत्नाकर यांनी केली.