शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चोरी, लूटमार करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:07 IST

नागपूर : चोरी, लूटमार करणाऱ्या एका भामट्याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली. स्वप्निल गजानन तेलमासरे (वय २०) असे आरोपीचे नाव ...

नागपूर : चोरी, लूटमार करणाऱ्या एका भामट्याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली. स्वप्निल गजानन तेलमासरे (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. तो कळमण्यातील चित्रशाळा नगरात राहतो.

तेलमासरे हा सराईत गुन्हेगार आहे. शांतीनगरातील बास्केटबॉल ग्राउंडजवळ राहणारे सुनीलकुमार बाबूलाल जैन (वय ६१) मार्च महिन्यात मध्य प्रदेशात गेले होते. लॉकडाऊनमुळे ते तिकडे अडकून पडले. आरोपी तेलमासरेने जैन यांच्या दाराचा कडीकोयंडा तोडून १२ हजारांची रोकड चोरून नेली. जैन यांनी ३ एप्रिलला दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी तेलमासरे हा बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास बाबा रामसुमेरनगर परिसरात उभा असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने जैन यांच्याकडे केलेल्या चोरीची कबुली दिली. चौकशीदरम्यान त्याने मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकाश शाहू नाम इसमाला चाकू मारून लुटल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. शांतीनगरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अरुण बकाल, हवालदार अब्दुल वकील शेख, विनोद समुद्रे, प्रवीण जाधव आदींनी ही कारवाई केली.

--