शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
5
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
7
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
8
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
9
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
11
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
12
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
13
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
14
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
15
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
16
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
17
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
18
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
19
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
20
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

नागपुरात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ पुतळा

By आनंद डेकाटे | Updated: May 8, 2023 18:15 IST

Nagpur News छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर उभारला जाणार आहे.

आनंद डेकाटे 

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे.

विद्यापीठाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत असून त्याचे औचित्य साधून या शताब्दी वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारत आहे. हा पुतळा ब्रांझ या धातूचा असून त्याची रीतसर परवानगी महाराष्ट्र शासनाच्या कला व संचालनालय विभागाने दिली आहे. जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ असा हा पुतळा राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतासह जगात मानवतावादी लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याचा सर्वांत पहिला यशस्वी प्रयत्न आहे. त्यामुळे राज्याभिषेकाची आठवण देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा हा जनतेच्या मनात मानवतावादी दृष्टिकोन जागवण्यासाठी प्रेरक ठरणार आहे.

कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते सोमवारी यासंदर्भातील माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्र- कुलगुरू डाॅ. संजय दुधे, स्मारक समितीचे अध्यक्ष डाॅ. मुधोजी राजे भोसले, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, सचिव मंगेश डुके, सहसचिव तथा अधिष्ठाता डाॅ. प्रशांत कडू, कोषाध्यक्ष विजय शिंदे, प्राचार्या डॉ. प्रविणा खोब्रागडे उपस्थित होते.

- अभ्यास व संशोधनाची संधीछत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, इतिहास संशोधक, अभ्यासक व नागरिकांना प्रगत शिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी यांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व कार्यावर अभ्यास करण्याची संधी प्राप्त होईल.

- असा असेल पुतळाछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची लांबी २० फूट, रुंदी १५ फूट असून उंची ९ फूट आहे. सिंहासनारूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असून त्यावरील छत्र ७ फूट आहे. ब्रांझ धातूने बनविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे वजन १०,००० किलोग्राम असेल. पुतळा मूर्तिकार सोनल कोहाड साकारणार आहेत.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज