शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भरधाव कारचा थरार, दुचाकीस्वार भाऊबहिणींना पुलावरूनच खाली पाडले

By योगेश पांडे | Updated: March 26, 2024 14:55 IST

पाचपावलीतील घटना : आरोपी दारुच्या नशेत, गाडीतून दारू-चाकू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळवडीचा दिवस नागपुरसाठी चांगलाच धक्कादायक ठरला. एका भरधाव कारच्या धडकेत पाचपावली उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार भाऊबहीण थेट खाली पडले. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कारचालक दारूच्या नशेत होता व त्याच्या गाडीतून दारूच्या बाटल्या व चाकू जप्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.

मोहम्मद ईरफान सलाउद्दीन अन्सारी (३०, आझाद नगर, टेका, पाचपावली) व फैजिया अन्सारी (२१) असे जखमी भाऊबहिणींचे नाव आहे. तर राहुल नारायण मंगले (४१, श्रीकृष्ण नगर, अयोध्यानगर) हा आरोपी आहे. धुळवडीच्या दिवशी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोघेही भाऊ बहीण त्यांच्या दुचाकीवरून कमाल चौकाकडून गोळीबार चौकाकडे चालले होते. त्याचवेळी राहुलने एमएच ३१ बीसी ११८५ ही लाल रंगाची कार दारूच्या नशेत भरधाव वेगात आणली. तो उड्डाणपुलावर रॉंग साईडने कार चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि थेट ईरफान व फैजिया यांना धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने दोघेही भाऊबहीण उड्डाणपुलावरून थेट खालीच पडले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी मेयो इस्पितळात नेले. तर वाहनचालक दारूच्या नशेत कारमध्येच होता. वेग इतका जास्त होता की पुलावरील कठडेदेखील तुटले. हा प्रकार पाहून उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

कारमध्ये चाकू व दारूच्या बाटल्यापोलिसांनी आरोपीच्या कारची झडती घेतली असता डिक्कीत दारूच्या दोन बाटल्या व चाकू आढळून आला. यासाठीदेखील पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

पुलाखाली काही सेकंदांनी दोन चिमुकले वाचले

या पुलाच्या खाली रहिवासी वस्ती आहे. तेथील घरांमधील चिमुकले पुलाखाली धुळवड असल्याने पिचकारीने रंग खेळत होते. दोघे भाऊ बहीण खाली पडले त्याच ठिकाणी ते खेळत होते. ते तेथून बाजुला झाले व काही सेकंदांनी भाऊ बहीण वरून खाली पडले. जर चिमुकले खालीच खेळत असते तर त्यांच्या जीवालादेखील धोका निर्माण झाला असता.

टॅग्स :Accidentअपघात