शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! हनुमंताचा साक्षात्कार झाल्यामुळे चोरट्याने गदा पुन्हा मंदिरात आणून ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 20:28 IST

चोरी केलेली गदा चोरट्याने पुन्हा मंदिरात आणून ठेवल्याची आगळीवेगळी घटना कन्हान येथे घडली. आपल्याला हनुमंताचा साक्षात्कार झाल्याने असे केल्याचे चोरट्याचे सांगणे होते.

ठळक मुद्देचोरलेली गदा मंदिरात आणून ठेवली

नागपूर : पांदण रोड कन्हान येथे हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमानाची एक किलो पितळेची गदा आणि अगरबत्ती पात्र चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने हनुमंताला नमस्कार केला. तिथे ठेवलेला प्रसादही ग्रहण केला होता. यानंतर झोळीत गदा घेऊन तो पसार झाला होता. हा घटनाक्रम मंदिराच्या सीसीटीव्हीत शनिवारी (दि. ८) कैद झाला होता. मात्र, चोरी केल्यानंतर हनुमंतांचा साक्षात्कार झाल्याचे सांगत चोरट्याने सोमवारी (दि.१०) गदा मंदिरात आणून ठेवली. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी संदीप परसराम लक्षणे (४२, रा. गहूहिवरा) याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पांदण रोडवरील हनुमान मंदिरात पुजारी पूजा अर्चा केल्यानंतर काही काळासाठी मंदिर बंद ठेवतो. शनिवारी सायंकाळी सात वाजता मंदिर उघडल्यानंतर पुजाऱ्याला मंदिरातील गदा आणि अगरबत्ती पात्र दिसून आले नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. यात एकजण गदा चोरताना दिसून आला. यानंतर मंदिर कमिटीच्या वतीने रविवारी (दि. ९) कन्हान पोलिसांत तक्रार देण्यात आली. यावरून कन्हान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र, हनुमंताचा साक्षात्कार झाल्याचे सांगत चोरटा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मंदिरात गदा घेऊन प्रकटला. तिथे उपस्थित मंदिर कमिटीच्या सदस्याने याबाबत पोलिसांना अवगत केले. यानंतर पोलिसांनी मंदिर गाठत त्याला ताब्यात घेतले.कान्द्रीच्या हनुमान मंदिरातसुद्धा झाली होती चोरीकांद्री येथील प्राचीन हनुमान मंदिराच्या गर्भगृहातील १९ हजार रुपये किमतीचा हनुमानजींचा २५० ग्रॅमचा चांदीचा मुकुट आणि चार किलो अष्टधातूची घंटा २९ सप्टेंबरला चोरीला गेली होती. याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके