शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तर नागपूर जिल्ह्यात १ ते २ अंशाने वाढेल तापमान; CSTP संस्थेचा धाेकादायक इशारा

By निशांत वानखेडे | Updated: March 10, 2024 18:22 IST

राज्यात ०.२५ ते ०.४२ अंश वाढीचा अंदाज

निशांत वानखेडे, नागपूर: सेंटर फॉर सायन्स, टेक्नालॅजी अॅण्ड पाॅलिसी या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या अभ्यासातून धाेकादायक इशारा दिला आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्याचे तापमान ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढण्याचा आणि बहुतेक जिल्ह्याचे तापमान प्रदूषणाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार १ ते २ अंशाने वाढण्याचा इशारा दिला आहे. हिव्वाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.

सातत्याने हाेत असलेले प्रदूषण वाढीमुळे २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ दीड नाही तर ३ अंशाने वाढण्याचा इशारा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फाॅर क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने आधीच दिला आहे. २०३० पर्यंत हाेणारी १ ते १.५ अंश तापमानवाढ २०२३ मध्येच गाठली आहे. भारत देश हवामान जोखीम निर्देशांकात ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ ऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही हवामान बदलासाठी विदर्भ आणि मध्य भारत हा अतिशय संवेदनशील भूभाग बनला असून पुढील काळात येथे राहणे कठीण होण्याचा इशारा अनेक संशोधनातून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाची आकडेवारी आणि काॅर्डेक्स (काेऑर्डिनेटेड रिजनल क्लायमेट डाउनस्केलिंग एक्सपेरिमेंट) माॅडेलच्या माध्यमातून प्रदूषणाच्या कमी व अधिक प्रमाणानुसार महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा निहाय खालील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१ अंशापेक्षा अधिक डिग्री तापमान वाढीचे जिल्हे : भंडारा-२.०, अकोला-१.३, अमरावती-१.६, नागपूर-१.१, औरंगाबाद-१.१, बीड-१.२, गोंदिया-१.१, बुलढाना-१.४, धुळे-१.१, हिंगोली-१.२, जळगाव-१.३, लातूर-१.४,, नंदुरबार-१.६, उस्मानाबाद-१.४, वर्धा-१.१, वाशीम-१.२, यवतमाळ-१.१ अंश.

- सर्वात कमी तापमान वाढीचे जिल्ह्ये : गडचिरोली,कोल्हापूर ,मुंबई,पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे.- सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र (०.८) तापमान वाढ आणि उष्ण लहरी कमी हाेण्याचा अंदाज आहे.

- प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ : अकोला-२.५ ,अमरावती -२.९,औरंगाबाद २.९, भंडारा-२.६, बुलढानां -२.३, धुळे २.२, गोंदिया-२.१, हिंगोली-२.२, जळगाव-२.५, जालना-२.७, नागपूर-२.२, नंदुरबार-२.५, नाशिक-२.४, वर्धा-२.१, वाशीम-२.३ डिग्रीने वाढेल.

नागपूरचे प्रदूषण२०२३ च्या ३६५ दिवसांपैकी केवळ ७० दिवस आरोग्यदायी श्रेणीत. १२५ दिवस हे साधारण प्रदूषणाचे श्रेणीत. १२१ दिवस माफक प्रदूषण, ४६ दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत, तर ३ दिवस आरोग्यास हानिकारक श्रेणीत आढळले आहेत.

गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकोर्ड तोडत आहेत. ऋतू बदल,हवामान बदल झाल्याचे हे जिवंत लक्षण आहे. जागतिक हवामान अभ्यास करणाऱ्या संस्थांनी भारताच्या हवामान बदलाविषयी जे अंदाज काढले ते अतिशय धोकादायक आहेत. महाराष्ट्राची ही आकडेवारी धाेक्याचे संकेत आहेत. त्यावर तातडीने उपाय याेजना करण्याची गरज आहे.- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलnagpurनागपूर