शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

"बार्टी'साठी पश्चिम महाराष्ट्र मायेचा, विदर्भ मावशीचा का?" विद्यार्थी संघटनेचा आरोप

By निशांत वानखेडे | Updated: December 13, 2023 18:58 IST

पुणे, नाशकात एमपीएससी प्रशिक्षणार्थी संख्येत वाढ; विदर्भाबाबत उदासीनता

निशांत वानखेडे, नागपूर: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील प्रत्येक विभागात एमपीएससीचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी निविदा काढून नाशिक व पुण्यात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात आली. विदर्भातील विद्यार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला मायेचा व विदर्भाकडे मावशीचा म्हणून भेदभाव करण्यात येत असल्याचा आराेप विद्यार्थी संघटनेने केला आहे.

युवा ग्रॅज्यूएट फाेरमचे अतुल खाेब्रागडे यांनी सांगितले, २०२३ मधे बार्टीने एमपीएससी क्लासेससाठी निविदा काढली, परंतु त्यात विदर्भाचा समावेश नव्हता. सुरुवातीला प्रत्येक विभागात २०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जाणार अशी भूमिका हाेती आणि पुणे व नाशिक विभागात प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले. ही संख्या कमी होते म्हणून पुन्हा नाशिक विभागात ३०० विद्यार्थी संख्या वाढवून ५०० करण्यात आली आणि पुणे विभागात संख्या ८०० ने वाढवून १००० करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून नागपूर विभागाला मात्र वंचित ठेवण्यात आले. अनुसूचित जातीची लाेकसंख्या विदर्भात सर्वाधिक आहे. तरी हा प्रकार म्हणजे विदर्भातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय असून हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आराेप खाेब्रागडे यांनी केला.

१८०० कर्मचारी, नागपुरात तीन-चारच कसे?

बार्टीमध्ये राज्यभरात कर्मचारी संख्या १८०० च्या घरात आहे. नागपूर कार्यालयात मात्र ३ ते ४ कर्मचार कार्यरत असल्याचे दिसतात. मग एवढे कर्मचारी कुठे सेवा देतात, असा सवाल खाेब्रागडे यांनी केला. जे कर्मचारी आहेत ते पुण्याच्या कार्यालयावर अवलंबून आहेत आणि पुण्याच्या ऑफिसमधून विदर्भाच्या समस्यांची दखलच घेतली जात नाही. मग बार्टीची कार्यकक्षा पुणे व पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का? बार्टीची भरती प्रक्रिया पारदर्शक नसून बाह्य स्राेतांमधून पदे भरली जात असल्याचा गंभीर आराेप अतुल खाेब्रागडे यांनी केला. नागपूर हे उपराजधानीचे शहर असून एवढी लाेकसंख्या असताना नागपूरला बार्टीच्या उपकेंद्राचाही दर्जा मिळू नये, ही शाेकांतिका हाेय, अशह टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री घेणार का दखल?महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरची ओळख आहे. विदर्भाचा विकास व्हावा हा उद्देश्य ठेऊन नागपुरात प्रत्येक वर्षाला हिवाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले. मात्र वर्षभर धाेरणात्मक स्तरावर दुजाभाव हाेत असताना हे अधिवेशनही दिखाव्यासाठी आहे काय, असा सवाल उपस्थित हाेत आहे. विदर्भातील प्रश्न योग्य रित्या हातळले जात नसतील तर अधिवेशनाला अर्थ काय? सामाजिक न्याय विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. मुख्यमंत्री याची दखल घेतील काय, असा सवाल अतुल खाेब्रागडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Studentविद्यार्थी