शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली

By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2025 00:09 IST

आई अन् मुलांची ताटातूट; कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये घटना: चित्रपटात ताटातुट झालेल्या आई आणि मुलांची भेट सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यात होते अन् नंतर सारा आनंदीआनंद बघायला मिळतो. सोमवारी ट्रेन नंबर २२५१२ कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये 'सेम टू सेम' असाच प्रकार घडला

- नरेश डोंगरे, नागपूर चिमुकल्यांना घेऊन निघालेली महिला एका रेल्वे स्थानकावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरते. ती पाणी भरत असतानाच ट्रेन सुटते. मुले ट्रेनमध्ये तर आई फलाटावर आक्रोश करतात. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा हा प्रसंग माँ (१९९९), रामपूर का लक्ष्मण (१९७२) आणि अशाच अनेक हिंदी चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे. चित्रपटात ताटातुट झालेल्या आई आणि मुलांची भेट सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यात होते अन् नंतर सारा आनंदीआनंद बघायला मिळतो. सोमवारी ट्रेन नंबर २२५१२ कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये 'सेम टू सेम' असाच प्रकार घडला अन् ती मुले, बिचारी आई तसेच रेल्वे स्थानकांवरील शेकडो प्रवाशांच्या मनात बराच वेळपर्यंत भावनांची धडधड होत राहिली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सोमवारी सकाळी ९.२० च्या सुमारास मुंबईकडे जाणारी कर्मभूमी एक्सप्रेस गोंदिया स्थानकावर थांबली. अन्य प्रवाशासोबत आई निरुपमा (नाव काल्पनिक) फलाटावरच्या नळावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरली. 

गर्दीमुळे तिला पाणी भरण्यास विलंब झाला अन् गाडीने रेल्वे स्टेशन सोडले. या गाडीत महिलेची राम आणि शाम (नावे काल्पनिक) ही दोन लहानगी होती. त्यामुळे तिच्या काळजात धस्स झाले.

मुलांपासून ताटातुट झाल्याने तिने एकच आक्रोश केला. तो बघता प्रवाशांनी गोंदिया स्थानकावरच्या रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) कळविले. प्रसंगावधान राखत त्यांनी रेल्वे कंट्रोलला कॉल दिला. 

नागपूरकडे येणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये दोन लहानगी असून, त्यांची तसेच त्यांच्या आईची ताटातुट झाल्याचेही कळविण्यात आले. ट्रेन मॅनेजर, टीसीसह रनिंग स्टाफने त्याची गंभीर दखल घेत लगेच त्या दोन लहानग्यांना शोधून पॅन्ट्री कारमध्ये बसविले. 

ईकडे गाडी नागपूर स्थानकावर पोहचताच आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल भानसे आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र सिंग यांनी राम आणि शामला ताब्यात घेतले. चाईल्ड लाईन प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांची वास्तपूस्त केली. त्यांना धीर देत खाऊही दिला.

ती पोहचली, अन् ...

कर्मभूमीच्या मागून नागपूरकडे येणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये त्या मातेला गोंदियाच्या रेल्वे स्टाफने बसवून दिले. निरुपमा नागपुरात पोहचली. फलाटावर उतरताच आरपीएफने तिला मुले असलेल्या ठिकाणी नेले. आईला दुरून बघताच राम आणि शाम धावतच येऊन आईला बिलगले. बिछडलेल्या मायलेकांचे मिलन अनेकांच्या नेत्रकडा ओल्या करणारे ठरले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNagpur Policeनागपूर पोलीसrailwayरेल्वे