शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांचा निर्ढावलेपणा; 'ब्रेक के बाद' पुन्हा काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2023 21:46 IST

Nagpur News वाळू माफियांवर कोणतीही कारवाई न करता या गोरखधंद्यात सहभागी असणाऱ्या भ्रष्ट मंडळींनी तस्करांना आश्वस्त केल्यामुळे की काय त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे सरकारचा लाखोंचा कर चुकवून चढ्या दराने वाळू तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे.

नरेश डोंगरेनागपूर : लोकमतच्या वृत्ताने हादरलेल्या वाळू तस्करांनी दोन दिवस ब्रेक घेतला. मात्र, वाळू माफियांवर कोणतीही कारवाई न करता या गोरखधंद्यात सहभागी असणाऱ्या भ्रष्ट मंडळींनी तस्करांना आश्वस्त केल्यामुळे की काय त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे सरकारचा लाखोंचा कर चुकवून चढ्या दराने वाळू तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे. या संबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील वाळू तस्करांची भाईगिरी सर्वत्र कुपरिचित आहे. अनेक बड्या गुन्हेगारांची आणि महसूल तसेच पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळींची साथ असल्याने जिल्ह्यातील वाळू माफिया नागपूर शहर आणि जिल्ह्यात वाळू तसेच गाैण आणि खनिजांची बिनबोभाट तस्करी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते हा गोरखधंदा करतात. यात कुणी प्रामाणिक अधिकारी आडवा आला तर त्याला आधी पैशाचे प्रलोभन दाखवले जाते. नंतर कुणाचे दडपण आणले जाते आणि त्यालाही जुमानत नसेल तर धाक दाखविला जातो. त्याला बदनाम करण्याचीही मजल मारली जाते. वाळू माफियांनी अनेकांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही प्रकार नागपूर जिल्ह्यात घडले आहेत. सरकारचा कर बुडवून वर्षाला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या वाळू माफियांना गुंड आणि महसूल तसेच पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळींची साथ असल्याने त्यांचे फारसे काही बिघडत नाही. जिल्ह्यातील रेती घाट सध्या बंद आहे. त्यामुळे वाळू माफिया मध्य प्रदेशातील विविध घाटांवरून चोरीची रेती नागपूर शहर आणि जिल्ह्यात आणतात आणि विकतात. कळमना जवळच्या भरतवाडा, पारडी भागातील विण्या उर्फ विनोद भुऱ्या नामक वाळू माफिया आणि त्याचे साथीदार चक्क स्वत:च्या घराजवळ आणि आजूबाजूच्या परिसरातील रिकाम्या जागेत रेतीचा अवैध साठा करून विकतात. लोकमतने या संबंधीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर वाळू तस्कर हादरले. त्यांनी दोन दिवस तस्करी बंद केली. मात्र, कारवाईचे अधिकार असणारांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. उलट त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे की काय तस्करांनी पुन्हा नव्या दमाने वाळू तस्करी सुरू केली आहे. यासंबंधीचा कळमन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात वाळू तस्करांची वाहने दिवसाढवळ्या साठविलेल्या ढिगाऱ्यातील रेती भरून नेत असल्याचे दिसून येते.

तीन दिवसांत १० हजारांची वाढ

वाळू माफिया चोरीच्या रेतीची तस्करी करतानाच मनमानी दराने विक्री करतात. तीन दिवसांपूर्वी वाळूचा ट्रक टिप्पर ४० ते ५० हजार रुपयांत विकत मिळत होता. आता हाच ट्रक वाळू माफिया विनोद आणि त्याच्या साथीदारांनी ५० ते ६० हजार रुपयांत विकण्याचा सपाटा लावला आहे. वाळू तस्करीत साथ देणाऱ्या महसूल आणि पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळींनी हे दर वाढवून दिल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे.

सरकारच्या नव्या धोरणाची प्रतीक्षावाळू माफिया सरकारचा दररोज लाखो रुपयांचा महसूल चोरतात. दुसरीकडे सर्वसामान्यांना दामदुप्पट दराने चोरीच्या रेतीची विक्री करतात. सरकारला फटका अन् सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या वाळू माफियांना महसूल आणि पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळींचीही साथ असल्याचे लक्षात आल्याने राज्य सरकारने वाळू तस्करांना चाप घालण्यासाठी नवे धोरण आखले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

----

टॅग्स :sandवाळू