शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीड तासात उधळली गाेंडखैरी काेळसा खाणीची जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2023 19:50 IST

Nagpur News नागपूरपासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावरील कळमेश्वर तालुक्याच्या गाेंडखैरी येथे प्रस्तावित भूमिगत काेळसा खाणीची जनसुनावणी पर्यावरणवाद्यांनी अवघ्या दीड तासात उधळून लावली.

नागपूर : नागपूरपासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावरील कळमेश्वर तालुक्याच्या गाेंडखैरी येथे प्रस्तावित भूमिगत काेळसा खाणीची जनसुनावणी पर्यावरणवाद्यांनी अवघ्या दीड तासात उधळून लावली. खाणीचा अहवाल गावकऱ्यांना मराठीत न मिळाल्याचा आक्षेप घेत कायदेशीर प्रक्रियाच अवलंबली गेली नसल्याचा आराेप केल्यानंतर हाेणाऱ्या प्रचंड विराेधामुळे ही जनसुनावणी रद्द करावी लागली.

गाेंडखैरी परिसरातील काेळसा खाणीचा पट्टा अदानी पाॅवर महाराष्ट्र लिमिटेडला देण्यात आला. येथे भूमिगत काेळसा खाण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र, या काेळसा खाणीला आसपासची २४ प्रमुख गावे व ८० च्यावर लहान गावांनी विराेध सुरू केला आहे. कंपनीच्या अर्जानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गुरुवारी कळमेश्वर तालुक्याच्या कारली तलावाजवळ जनसुनावणी आयाेजित केली हाेती. सुनावणी अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चाैधरी, एमपीसीबीच्या विभागीय अधिकारी हेमा देशपांडे, एसआरओ राजेंद्र पाटील तसेच कंपनीचे अधिकारीही उपस्थित हाेते. एमपीसीबीच्या पत्रानंतर आधीच २४ ग्रामपंचायतींनी ठराव पारीत करीत खाणीला विराेध दर्शविणारे पत्र एमपीसीबीला सादर केले हाेते.

अपेक्षेप्रमाणे विराेध करणाऱ्या बहुतेक गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांसह पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यही सुनावणीस हजर झाले हाेते. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, अनिल देशमुख व रमेश बंग तसेच कळमेश्वर पंचायत समिती सभापती प्रभाकर पवार, उपसभापती अविनाश पारधी, जिल्हा परिषद सदस्य भारती पाटील आदी उपस्थित हाेते. सुनील केदार यांनी खाणीसंदर्भात ग्रामपंचायतींना सादर केलेला अहवाल इंग्रजीत असल्याने नागरिकांना समजण्यास अडचण हाेत असल्याचा आक्षेप घेतला. हा अहवाल मराठीतून दिला गेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनिल देशमुख यांनीही खाणीविराेधात भूमिका मांडत एमपीसीबीच्या अधिकारी देशपांडे यांना काेळसा खाण बंद करण्याबाबत निवेदन सादर केले. नागरिकांनी ‘बंद करा, बंद करा कोळसा खाण बंद करा’, अशी नारेबाजी करीत आपला विराेध दर्शविला. नागरिकांकडून हाेत असलेला प्रचंड विराेध पाहता जनसुनावणी रद्द करण्याची घाेषणा आरडीसी सुभाष चाैधरी यांनी केली.

कायदेशीर प्रक्रिया दुर्लक्षित केली

यावेळी पर्यावरण तज्ज्ञ सुधीर पालिवाल यांनी एमपीसीबीची वेबसाईट दाेन दिवसांपासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वेबसाईट बंद असल्याने बहुतेकांना कंपनीचा अहवाल वाचता आला नाही व सुनावणीत ऑनलाइनही उपस्थित राहता आले नाही. शिवाय ज्याने खाणीचा अहवाल तयार केला, त्याच व्यक्तीकडून सुनावणीत सादरीकरण हाेणे अपेक्षित हाेते पण एका प्रयाेगशाळेच्या प्रतिनिधीद्वारे खाणीचा अहवाल सादर करण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.

खाणीच्या समर्थनात एकही उभा झाला नाही

सुनावणीवर आक्षेप हाेत असताना काेळसा खाणीच्या समर्थनात काेण आहे, असे विचारण्यात आले तेव्हा कुणीही हात वर केले नाही व शुकशुकाट पसरला. विराेध कुणाचा आहे, असे विचारल्यावर उपस्थित सर्व नागरिक एकाच वेळी उभे हाेऊन खाणीच्या विराेधात घाेषणाबाजी करू लागले.

लाेकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून तीव्र विराेध झाल्याने सध्या जनसुनावणी रद्द करण्यात आली. लाेकांनी खाणीबाबत अहवालाचे सादरीकरण बंद पाडले. यापुढे सुनावणी हाेणार, नाही हाेणार किंवा प्रकल्पाबाबत आता काही सांगता येणार नाही.

- हेमा देशपांडे, विभागीय अधिकारी, एमपीसीबी

टॅग्स :Socialसामाजिक