शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांच्या पैशांतून ‘फाल्कन’च्या प्रमोटर्सने घेतले चार्टर्ड प्लेन, चार वर्षांत असा रचला ट्रॅप

By योगेश पांडे | Updated: March 13, 2025 00:05 IST

दिवसाला ६ ते ८ कोटींचे इन्व्हॉइस फाल्कन इन्व्हॉइस डिस्काउंटच्या प्लॅटफॉर्मवर दिसायचे. यात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना ३० दिवस ते १८५ दिवसांत नफ्यासह रक्कम परत करण्याचे आमिष दिले जात होते.

-योगेश पांडे, नागपूर नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांसोबतच देशभरातील हजारो नागरिकांना ‘फाल्कन इन्व्हॉइस डिस्काउंट’ या कंपनीने कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ‘फाल्कन’च्या प्रमोटर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांचा अक्षरश: चुराडा केला असून, संचालक अमरदीप कुमार याने तर चार्टर्ड प्लेनदेखील विकत घेतले होते. महाराष्ट्रात पोलिसांनी अद्यापही हे प्रकरण गंभीरतेने घेतले नसले तरी देशातील काही शहरांत मात्र युद्धपातळीवर आरोपींचा शोध सुरू आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांची ‘फाल्कन’ने साडेतेरा लाखांची फसवणूक केली. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यावर खळबळ उडाली आहे. ‘फाल्कन’कडून व्हेंडर कंपन्यांचे इन्व्हॉइस ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिले जात होते. 

दिवसाला ६ ते ८ कोटींचे इन्व्हॉइस फाल्कन इन्व्हॉइस डिस्काउंटच्या प्लॅटफॉर्मवर दिसायचे. यात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना ३० दिवस ते १८५ दिवसांत नफ्यासह रक्कम परत करण्याचे आमिष दिले जात होते. यातून अनेकांनी स्वत:च्या मेहनतीच्या कमाईचे करोडो रुपये यात टाकले. मात्र ‘फाल्कन’च्या कार्यालयांना टाळे लागले व त्यानंतर हा घोटाळा समोर आला.

संचालक अमरदीप कुमार याने गुंतवणूकदारांच्या पैशांतून २०२३ च्या अखेरीस चार्टर्ड प्लेन विकत घेतले होते. ते त्याने दुसऱ्या कंपनीच्या नावे दाखविले होते; परंतु उपयोग तोच करत होता. संबंधित चार्टर्ड प्लेनचा उपयोग एअर ॲम्ब्युलन्स म्हणूनदेखील सुरू झाला होता.

‘फाल्कन’चा संचालक एअर ॲम्ब्युलन्सने फरार?

फाल्कनचा संचालक अमरदीप सिंग मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून फरार आहे. तो वापरत असलेल्या चार्टर्ड प्लेनचा एअर ॲम्ब्युलन्स म्हणून उपयोग करत तो दुबईला गेल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित विमान दुबईहून परतले होते व त्यानंतर कस्टम्सने त्याची तपासणी केली होती.

२०२१ पासून सुरू आहे गंड्याचा फंडा

२०२१ साली अमरदीप कुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी ‘फाल्कन’च्या नावाने गुंतवणुकीची योजना लाँच केली. फाल्कन हे २०१५ मध्ये स्थापन झालेल्या कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स प्रायव्हेट लिमिटेडअंतर्गत संचालित नोंदणीकृत नाव आहे. 

तेव्हापासून अनेक सुशिक्षित, उच्चपदस्थ व श्रीमंत गुंतवणूकदार त्यांच्या गळाला लागले. ‘फाल्कन’ने गुंतवणूकदारांकडून जवळपास १७५० कोटींची गुंतवणूक मिळविली व त्यातील साडेआठशे कोटी सुरुवातीला परतदेखील केले. 

मात्र उर्वरित पैसे कंपनीने घशात घातले असून, आता नागपुरातील न्यायाधीशांसारखे गुंतवणूकदार पैसे परत मिळतील की नाही या चिंताचक्रात अडकले आहेत. कंपनीच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबई, रोहतक इत्यादी ठिकाणच्या कार्यालयांना टाळे लागले आहे.

टॅग्स :InvestmentगुंतवणूकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीस