शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पंतप्रधानांमधील स्वयंसेवकाचे दर्शन, वंदनातून आद्य सरसंघचालक प्रणाम, नागपुरातील संघ शिक्षा वर्ग, बैठकींच्या जागविल्या आठवणी

By योगेश पांडे | Updated: March 31, 2025 06:09 IST

Narendra Modi In RSS Headquarters: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे चारहून अधिक नागपूर दौरे झाले. मात्र ते एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय किंवा डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात न गेल्याने स्वयंसेवकांच्या भुवयादेखील दरवेळी उंचावल्या जात होत्या. मात्र रविवारी संघ प्रणालीत महत्त्वाचा उत्सव असलेल्या वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावरच पंतप्रधान स्मृतिमंदिरात पोहोचले.

- योगेश पांडेनागपूर -  पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे चारहून अधिक नागपूर दौरे झाले. मात्र ते एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय किंवा डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात न गेल्याने स्वयंसेवकांच्या भुवयादेखील दरवेळी उंचावल्या जात होत्या. मात्र रविवारी संघ प्रणालीत महत्त्वाचा उत्सव असलेल्या वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावरच पंतप्रधान स्मृतिमंदिरात पोहोचले. विशेष म्हणजे नागपूर दौऱ्यात जागोजागी पंतप्रधानांमधील स्वयंसेवकाचे सार्वजनिक पद्धतीने दर्शन झाले. सोबतच इतर स्वयंसेवकांप्रमाणे आद्य सरसंघचालकांच्या जयंतीच्या दिवशीच अभिवादन करत आपल्या पद्धतीने आद्य सरसंघचालक प्रणामदेखील केला. यावेळी त्यांच्या संघजीवनातील वर्ग व बैठकांच्या आठवणीदेखील जागविल्या. या तिहेरी योगामुळे संघ वर्तुळात उत्साहाचे वातावरण होते.

सकाळी डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचल्यावर पंतप्रधान हे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच इतर मान्यवरांसोबत अगोदर डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या समाधिस्थळी दर्शनाला गेले. एरवी समाधिस्थळाचे दर्शन घेताना मान्यवर मंडळी एकदा नतमस्तक होतात. मात्र मोदी काही काळ तेथे स्तब्ध झाले आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधिस्थळासमोर दोनदा नतमस्तक झाले.

पायी फिरून घेतले दर्शनगुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृतिमंदिर परिसरात आले होते. त्यानंतरच्या काळात परिसराचे नूतनीकरण व सुशोभीकरण झाले. मोदींनी त्याची माहिती सरसंघचालकांकडून जाणून घेतली. समाधिस्थळावरून ते परिसरातील दत्तोपंत ठेंगडी सभागृहाकडे वाहनाऐवजी प्रोटोकॉल बाजूला सारून सरसंघचालकांसोबत पायीच निघाले. यावेळी संघ शिक्षा वर्ग व बैठकांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मोदींच्या चेहऱ्यावरूनदेखील ते स्पष्टपणे जाणवत होते.

संघ पदाधिकाऱ्यांसोबत ‘शॉर्ट’ चर्चादर्शनानंतर पंतप्रधानांनी महर्षी व्यास सभागृहाचे निरीक्षण केले. या सभागृहात संघाच्या सर्व मोठ्या बैठकी होतात. यानंतर दत्तोपंत ठेंगडी सभागृहात संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना माजी सरकार्यवाह व संघाच्या कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तेथे सहसरकार्यवाह अतुल लिमये, मुकुंदा जी., संघ पदाधिकारी सुरेश सोनी, प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग हेदेखील उपस्थित होते. तेथेदेखील एखाद्या स्वयंसेवकाप्रमाणेच पंतप्रधानांचे वर्तन होते आणि अगदी सहजतेने ते २० हून अधिक पदाधिकाऱ्यांमध्ये मनमोकळेपणाने मिसळले.

काय आहे आद्य सरसंघचालक प्रणामसंघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा वर्ष प्रतिपदेच्या दिवशीच जन्म झाला होता. या दिवसाचे संघ प्रणालीत मोठे महत्त्व असून सहा प्रमुख उत्सवांपैकी हा उत्सव आहे. केवळ याच दिवशी स्वयंसेवक आद्य सरसंघचालक प्रणामाच्या माध्यमातून डॉ. हेडगेवार यांना वंदन करतात. पंतप्रधानांनी दौऱ्यासाठी हा मुहूर्त साधला व त्यांच्या समाधिस्थळी नमन केले. संवैधानिक पदावर व अधिकृत दौऱ्यावर असल्याने त्यांनी प्रत्यक्ष स्वयंसेवकाप्रमाणे संघ प्रणाम न करता नमस्कार तसेच वंदन केले. संघाच्या परिभाषेत दायित्व निभावत असताना त्यांनी त्यांच्या कर्तव्याचेदेखील पालन करत स्वयंसेवकांना त्यांच्या कृतीतून नेमका संदेश दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ