शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ हिंदू-मुस्लीमच नव्हे तर सर्व धर्माच्या ऐक्याची गरज

By आनंद डेकाटे | Updated: April 26, 2025 17:06 IST

संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण : दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन

आनंद डेकाटे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धार्मिक उन्मादामुळे प्रत्येक देश आतून पोखरला जातोय. त्यामुळे केवळ हिंदू-मुस्लीम एकोप्याचे कार्य करून चालणार नाही. तर जगातील सर्व धर्माच्या ऐक्याच्या कार्याची या देशाला व जगाला अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू, एमआयटी पुण्याचे सल्लागार आणि दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण यांनी येथे केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे मातोश्री विमलताई देशमुख सभागृह धनवटे नॅशनल काॅलेज येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या परिसराला मरहूम डाॅ. अक्रम पठाण साहित्य नगरी तर विचारपीठाला महात्मा ज्योतिबा फुले-डाॅ. आंबेडकर विचार मंच असे नाव देण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. अनुपमा उजगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार हुसेन दलवाई, प्राचार्य डाॅ. प्रशांत कोठे, मुख्य आमंत्रक प्रा. जावेद पाशा कुरैशी, प्रा. कोमल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन सरदार, अब्दुल रऊफ शेख, सरदार जगजित सिंग, ॲड. आसिफ कुरैशी, प्रा. रमेश पिसे, प्रा. फ. म. शहाजिंदे, ज्ञानेश्वर रक्षक, कुलदीप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.

संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण म्हणाले, मुस्लीम समाजाला शिक्षणाचे कार्यच विकासाकडे घेऊन जाईल. त्यामुळे शिक्षणावर अधिक भर द्या. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा समन्वयाचा जागर करा. या संमेलनाचा कुठलाही राजकीय अजेंडा नाही. सर्व विचारांना सामावून घेण्यासाठी हे संमेलन असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत या संमेलनातून हिंदू-मुस्लीम एकोप्याचा संदेश जाऊ द्या. वारकरी संत व सुफी संतांनी मांडलेल्या सांप्रदायिक सद्भावाची आज २१ व्या शतकात फार गरज आहे. या संमेलनातून हा सांप्रदायिक सद्भाव व समन्वयाचा संदेश गेला तर मी या संमेलनाचा मुख्य संदेश समजेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. डाॅ. शरयू तायवाडे या स्वागताध्यक्ष होत्या. परंतु आजारपणामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांच्या वतीने प्रा. कोमल ठाकरे यांनी स्वागताध्यक्षांचे भाषण वाचून दाखविले.

मुख्य आमंत्रक प्रा. जावेश पाशा कुरैशी यांनी संमेलनाची भूमिका विशद केली. ते म्हणाले, हे संमेलन केवळ मुस्लिमांचे नाही, तर मुसलमान म्हणून व्यक्त होण्याशिवाय पर्याय नाही, हे दाखवण्यासाठीचं आहे. मुस्लिम हे अब्दुल कलाम यांच्यासारखे मिसाईलमॅनही आहेत, हे दाखवण्यासाठी आहे. सरदार जगजित सिंग, नितीन सरदार, अब्दुल रउफ शेख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचालन नेहा गोडघाटे यांनी केले. तर मुबारक शेख यांनी आभार मानले. 

आज खरी गरज चांगला माणूस होण्याची आहे - उद्घाटक डाॅ. अनुपमा उजगरेडाॅ. अनुपमा उजगरे संमेलनाचे उद्घाटन करताना म्हणाल्या, सध्या लोकांची भाषा अतिशय वाईट होत चालली आहे. आज चांगले साहित्यिक होण्यापेक्षा चांगले माणूस होण्याची खरी गरज आहे. हे दहावे संमेलन आहे. असेच शंभरावे संमेलनसुद्धा व्हावे, यासाठी सातत्याने साहित्यनिर्मिती होण्याची गरज आहे. त्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद चांगल्या भाषेत व्हावा. साहित्य हे माणसाला जोडते. त्यामुळे सर्व समाजामध्ये सलोखा असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मृतांना श्रद्धांजलीसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अय्युब नल्लामंदू यांनी कुरआन आयतीचे पठण केले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. जैबुन्नीसा शेख, प्रा. रुबीना पटेल यांच्यासह अनेकांचे सत्कार

स्मरणिकेसह विविध पुस्तकांचे प्रकाशन

यावेळी मऱ्हाठवाणी या स्मरणकिसह प्रा. डाॅ. प्रमोद मनघाटे लिखीत राष्ट्रंत तुकडोजी महाराज, प्रा. जावेद पाशा कुरैशी लिखीत हिंदूत्व आणि धर्मांतरीत मुसलमानांपुढील आव्हाने, अबरार नल्लामंदू संपादित कासिद संमेलन विशेषांक, मुजफ्फर सय्यद लिखीत ईद मिलन विशेषांक, डाॅ. के.जी. पठाण यांचे उतार वयातील चढण काव्यसंग्रह, गौस शिकलगार यांचे शब्द सारथी आणि मुबारक शेख लिखीत अजान आणि चालीसा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 

जैबुन्नीसा शेख, प्रा. रुबीना पटेल यांच्यासह अनेकांचे सत्कारयावेळी जैबुन्नीसा शेख, प्रा. रूबीना पटेल, शकील पटेल, डाॅ. मुहीम कादरी, डाॅ. शाहीद अली जाफरी, डाॅ. जलील पटेल, डाॅ. अर्जीनबी शेख, जहीरुद्दीन शेख, मलिका शेख, रहीम शेख बंदी, जमील अंसारी, यामिनी चौधरी, डाॅ. विनोद राऊत, नासीर जुम्मन शेख, नेहा गोडघाटे, शैले जैमिनी, हाजी नासीर यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :nagpurनागपूर