शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कापूस व तुरीच्या शेतात असलेल्या महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2023 20:38 IST

Nagpur News शेतातील कापूस व तुरीच्या पिकात बसली असलेल्या महिलेच्या डोक्यावर शुक्रवारी (दि. १३) दुपारी २ वाजताच्या सुमारास जाड व धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले.

 

नागपूर : शेतातील कापूस व तुरीच्या पिकात बसली असलेल्या महिलेच्या डोक्यावर शुक्रवारी (दि. १३) दुपारी २ वाजताच्या सुमारास जाड व धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. त्या महिलेचा साेमवारी (दि. १६) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवाणी शिवारात घडली असून, तिच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

शोभा अशाेक कराडे (३७, रा. सुरेवाणी, ता. सावनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. ती शुक्रवारी दुपारी ठेक्याने केलेल्या शेतातील कापूस व तुरीच्या पिकात एकटी बसली हाेती. अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यावर जाड व धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर दुखापत झाल्याने तिला नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. तिचा साेमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी शोभाचा भाऊ जितेंद्र माणिक कोचे (३०, रा. काेटलबर्री, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) याने शनिवारी (दि. १४) पोलिसात तक्रार दाखल केल्याने खापा पाेलिसांनी भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाच्या गुन्ह्याची नाेंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.पती तुरुंगातसुरेवाणी शिवारातील तलावाच्या काठी वाघाची शिकार केल्याप्रकरणी मृत शोभाचा पती अशाेक कराडे याच्यासह देवराव मडावी, ऋषी साहरे (दाेघेही रा. सुरेवाणी) आणि नितेश वागधरे (रा. चाेरखैरी, ता. सावनेर) यांना दीड महिन्यापूर्वी वन विभागाने अटक केली हाेती. हे सर्व आराेपी सध्या नागपूर शहरातील मध्यवर्ती कारागृहात आहेत.संशयित पाेलिसांच्या ताब्यातआबू ऊर्फ दिनेश उईके (२१, रा. सुरेवाणी) हा घटनेच्या वेळी शोभाच्या शेतात आला हाेता, अशी माहिती शोभाचा भाऊ जितेंद्र कोचे याने पाेलिसांना दिली हाेती. घटनास्थळी रक्त पडून असल्याचे तसेच शोभाचा मृत्यू घातपात असल्याचेही त्याने पाेलिसांना सांगितले हाेते. या प्रकरणात पाेलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, या प्रकरणात आराेपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी