शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

नंदनवनमधील खून झाला ‘डबल मर्डर', जखमी तरुणाचाही मृत्यू

By योगेश पांडे | Updated: February 11, 2024 19:07 IST

पोलिसांकडून तीनही आरोपींना अटक : १० दिवसांत दोन ‘डबल मर्डर’

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री झालेल्या खुनामुळे खळबळ उडाली होती. आता याचादेखील ‘डबल मर्डर’च्या घटनेत समावेश झाला आहे. या घटनेतील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. १० दिवसांत दोन ‘डबल मर्डर’ व इतर चार खून झाल्याने शहराच्या गुन्हेगारीची राज्यभरात चर्चा आहे.

पैशांच्या उधारीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विलास उर्फ मटर रामकृष्ण वानखेडे (३२, हिवरी नगर, ह.मु धरमनगर, भरतवाडा), नितीन रामकृष्ण वानखेडे (२७, धरमनगर, भरतवाडा) व शुभम उर्फ चुक्का छोटेलाल बिरहा (३२, धरमनगर, भरतवाडा) यांनी नीरज शंकर भोयर (२८, गरोबा मैदान) व विशाल राऊत (२७, क्वेटा कॉलनी) यांच्यावर हल्ला केला व फरशीने वार केले. यात नीरजचा मृत्यू झाला होता तर विशाल गंभीर जखमी होता. त्याला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचादेखील मृत्यू झाला. विशालचा भाऊ हिमांशूच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्क तसेच ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आरोपींचा शोध केला व शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक केली.

जुगार अड्ड्यांवर नियंत्रण कधी ?शहरातील नंदनवन, लकडगंज, सक्करदरा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे चालतात. मात्र पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. या प्रकरणातील आरोपी विलास हादेखील जुगार अड्डा चालवायचा. विलास व नीरज त्यात कधी कधी सहकार्य करायचे. पैशांच्या देवाणघेवाणीतूनच त्यांच्यात वाद झाले होते. 

टॅग्स :nagpurनागपूर