शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

 नागपूर मेट्रोने उभारला देशातील सर्वात मोठा थ्रीडी-२० लोगो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 21:09 IST

Nagpur News नागपूर शहरातील विविध संस्थांकडून जी-२० परिषदेची तयारी सुरू असताना नागपूर मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन येथे जी - २० थीमवर एक मोठा थ्रीडी लोगो बसविण्यात आला आहे.

नागपूर: शहरातील विविध संस्थांकडून जी-२० परिषदेची तयारी सुरू असताना नागपूर मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन येथे जी - २० थीमवर एक मोठा थ्रीडी लोगो बसविण्यात आला आहे. हा लोगो आणि इतर क्रिएटिव्ह मॉडेल हे देशातील एकमेव मॉडेल ठरले आहे. 

महा मेट्रोने बनवलेल्या लोगो मध्ये टायगर मॅस्कॉट, जी-२० आणि नागपूर मेट्रोच्या लोगोचा समावेश आहे.  १३० फूट रुंद आणि २० फूट उंच, अश्या सुमारे १००० किलो वजनाची ही संपूर्ण रचना आहे. संपूर्ण साहित्य फायबर रीइन्सफोर्ट प्लास्टिक (FRP) च्या माध्यमाने बनविण्यात आले आहे.  

एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन समोरील ३०,००० स्क्वेअर फूट परिसरात थीम पार्क तयार केला जात असून त्यात हा लोगो स्थित आहे. विविध आकर्षक फुलांच्या रोपट्यांनी हे उद्यान सजवले जाईल. या थीम पार्कमध्ये अभ्यागतांसाठी बसण्याची तसेच स्केटिंगची व्यवस्था असेल. या सोबतच करमणुकीचे इतर साधने देखील असतील. 

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पूर्तीच्या निमित्ताने `आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत नागपूर मेट्रोने झिरो माइल स्टेशनला झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन असे नाव दिले आहे. झिरो माईल फ्रीडम पार्क नंतर, आता थीम पार्कच्या निमित्ताने आता नागपूर मेट्रो आणखी एक विशेष निर्मिती करीत आहे. हा थीम पार्क शहराती सर्वात गजबजलेल्या वर्धा मार्गाला लागून असल्याने नागपूरकरांकरिता  ही एक पर्वणी ठरणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो