शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
4
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
5
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
6
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
7
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
8
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
9
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
10
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
11
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
12
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
13
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
14
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
15
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
16
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
17
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
18
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
19
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
20
KL Rahul Captain, IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?

दरोडा टाकण्यापूर्वीच हातात पडल्या बेड्या; एक फरार, चौघांना अटक

By दयानंद पाईकराव | Updated: December 25, 2023 15:19 IST

चाकू, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पावडर जप्त

नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी गजाआड करून त्यांच्या ताब्यातून चाकू, लोखंडी रॉड, सब्बल, दोरी, मिरची पावडर जप्त असा एकुण ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ११.१० ते १२.४० दरम्यान घडली असून यातील एक आरोपी फरार झाला आहे.

कुणाल भिमराव वाघमारे (वय २८, रा. खापरी पुनर्वसन, वर्धा रोड), राहुल यादवराव गुमेकर (वय ३०, रा. वेशाली नगर, चिंचभवन), शैलेश लिलाधर वासनिक (वय २६, रा खापरी पुनर्वसन, वर्धा रोड) आणि रोशन सुभाष सिंग (वय २५, रा. जयताळा बाजार चौैक झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रतिक उर्फ गोलु पटेल (रा. श्रमिकनगर झोपडपट्टी परसोडी) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

बेलतरोडी पोलीसांचे तपास पथक कोंबींग ऑपरेशन राबवित असताना त्यांनी चिंचभवन पुलाकडून शिवनगाव पुनर्वसनकडे जाणाऱ्या  रस्त्याच्या बाजुला असलेल्या मोकळ्या मैदानात धाड टाकली. तेथे आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत आढळले. आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चाकू, लोखंडी रॉड, सब्बल, दोरी, मिरची पावडर जप्त असा एकुण ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कलम ३९९, ४०२, सहकलम ४, २५, १३५ नुसार गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.