शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जाहीर होणार

By आनंद डेकाटे | Updated: January 21, 2024 18:45 IST

येत्या मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशी राजकीय पक्षाची सभा व पत्रकार परिषद घेऊन मतदार यादी संदर्भात माहिती देण्यात येणार असल्याचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा सुधारित संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा २२ जानेवारी असा होता. तथापि महाराष्ट्र शासनाच्या १९ जानेवारीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी रोजी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या १९ जानेवारीच्या पत्रानव्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येत्या मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. नागपूर जिल्हास्तरावरील विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी विषयक तसेच निवडणूक विषयक जनजागृती करण्याकरिता सिव्हील लाईन येथील डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात ‘फरक पडतो’ या पथनाट्य स्पर्धेचे आयोजन २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर