शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयच्या कोठडीतील सीजीएसटी सहआयुक्तांचे पाय खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 08:00 IST

Nagpur News सीबीआयच्या कोठडीत असलेले सीजीएसटीचे सहआयुक्त मुकुल पाटील यांच्या कार्यालयातून संशयास्पद नोंदी असलेली अनेक कागदपत्रे सीबीआयच्या पथकाने शनिवारी जप्त केली.

ठळक मुद्देसंशयास्पद नोंदीसह महत्त्वाची कागदपत्रे जप्तबँकेच्या लॉकरमध्येही सोन्याचे घबाड - अडचणी वाढणार

नरेश डोंगरे

नागपूर : सीबीआयच्या कोठडीत असलेले सीजीएसटीचे सहआयुक्त मुकुल पाटील यांच्या कार्यालयातून संशयास्पद नोंदी असलेली अनेक कागदपत्रे सीबीआयच्या पथकाने शनिवारी जप्त केली. त्याचप्रमाणे त्यांच्या बँकेतील लॉकरमध्येही सीबीआयला सोन्याच्या दागिन्यांचे घबाड मिळाले. या घडामोडींमुळे पाटील-राजंदेकर या जोडीचे पाय आणखी खोलात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील जयंत लक्ष्मीकांत चौपाणे नामक कंत्राटदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने हेमंत राजंदेकर या चार्टर्ड अकाउंटंटसह मुकुल पाटील यांना ताब्यात घेतले होते. सध्या हे दोघे सीबीआयच्या कोठडीत आहेत. सीबीआयच्या पथकाकडून मुकुल पाटील यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. त्यात ४० तोळे सोने, १३.२५ लाखांची रोकड सीबीआयच्या हाती लागली. शनिवारी पाटील यांच्या कार्यालयातून सीबीआयने संशयास्पद नोंदी असणारी अनेक कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांत देण्याघेण्याच्या अनेक नोंदी असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. दरम्यान, पाटील यांच्या बँकेतील लॉकरचीही सीबीआयच्या पथकाने शनिवारी तपासणी केली. यात २६ लाखांचे सोन्याचे दागिने सीबीआयच्या हाती लागले. त्यात वेगवेगळ्या वजनांचे गोल्ड क्वाईनही आहेत. या संबंधाने सीबीआयचे वरिष्ठ अधीक्षक सलीम खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाटील आणि राजंदेकर यांची कसून चाैकशी सुरू असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

डायरीतही दडले आहे ‘राज’

सीए हेमंत राजंदेकर यांच्या घर, तसेच कार्यालयात झडती घेतली असता सीबीआयला दोन डायऱ्या आढळल्या. त्यात अनेक सांकेतिक नोंदी आहेत. या नोंदीत अनेकांचे ‘राज’ दडले आहे. पाटील आणि राजंदेकर हे दोघे ७ मार्चपर्यंत सीबीआयच्या कोठडीत आहेत. या दोन दिवसांत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

आरोपींची संख्या वाढणार

सीबीआयच्या हाती लागलेली कागदपत्रे आणि डायरी बरीच बोलकी आहे. त्यातून अनेकांचे व्यवहार उघड होण्याची चर्चा आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही संबंधित सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान, आरोपींची संख्या वाढण्याचे संकेत मिळाल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

----

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग