शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्षणोक्षणी मृत्यूचे भय, तरीदेखील ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत; युक्रेनच्या राजधानीतून ‘एरोस्पेस सायंटिस्ट’चा ‘आंखो देखा हाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 07:05 IST

Nagpur News पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देअनेक भारतीय रोमानिया सीमेकडे रवाना

 

योगेश पांडे

नागपूर : सातत्याने बॉम्बचे आवाज, आजुबाजूचे भेदरलेले चेहरे, सर्व दुकाने बंद असल्यामुळे दैनंदिन गोष्टींचा तुटवडा अन् अशास्थितीत आपल्या मायभूमीची लागलेली आस. कोणत्याही क्षणी एखाद्या बॉम्बच्या स्वरुपात मृत्यू समोर उभा ठाकण्याची शक्यता असतानादेखील युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये भारतीय लोकांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. मूळचे नागपुरातील व मागील १७ वर्षांपासून युक्रेनमध्ये असलेले एरोस्पेस सायंटिस्ट राजेश मुनेश्वर यांनी हा ‘आंखो देखा हाल’ ‘लोकमत’ला सांगितला आहे.

राजेश हे त्यांची पत्नी व मुलासह कीव्हमध्ये राहतात. सर्व हवाई वाहतूक बंद असल्याने भारतात परतण्यासाठी इतरांप्रमाणे त्यांचीदेखील धडपड सुरू आहे. युक्रेनच्या विविध शहरांमध्ये हल्ला झाल्यानंतर कीव्हजवळच रशियन सैन्याने हेलिकॉप्टरदेखील पाडले. सातत्याने आम्हाला बॉम्बहल्ल्यांचा आवाज ऐकू येत आहे. युक्रेनच्या सैन्याचादेखील प्रतिकार सुरू आहे. मात्र, कीव्हमधील दोन्ही विमानतळ बंद करण्यात आले आहेत.

रशियाच्या हल्ल्यामुळे ‘एअरलिफ्ट’ची शक्यता मावळली. मात्र विमानतळाकडे निघालेले अनेक भारतीय नागरिक व विद्यार्थी रस्त्यांवर अर्ध्यातच अडकले. किव्हमध्ये भारतीय दुतावास तसेच भारतीय नागरिकांनी अशा विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यासाठी धाव घेतली आहे. मृत्यूचे भय असतानादेखील काही लोकांना घरी तर काहींना जवळील शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. अनेक विद्यार्थी किव्हमधील भारतीय दुतावासासमोर जमले आहेत. या विद्यार्थ्यांना बसेसच्या मदतीने रोमानियामध्ये नेण्यात येणार आहे. परंतु सध्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. ते आमच्यासमोरील मोठे आव्हान राहणार असल्याची माहिती राजेश मुनेश्वर यांनी दिली. राजेश यांनी स्पेस लॉंच वेहिकल प्रकल्पात युक्रेन सरकारसोबत काम केले आहे हे विशेष.

डोळ्यांनी दिसताहेत आगीच्या ज्वाळा

बोरिस्पिल विमानतळावर हल्ला झाला असून राजेशच्या घरापासून अवघ्या अडीच किमीवर अंतरावर असलेल्या झुलियानी विमानतळावर कधीही हल्ला होण्याची शक्यता आहे. ‘एअरलिफ्ट’ची शक्यता संपली असून पोलंड व रोमानियाकडे जाण्याची सूचना भारतीय दुतावासाने केली आहे. या दोन्ही देशांनी त्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत व हा आमच्यासाठी आशेचा मोठा किरण असल्याची भावना राजेश यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. डोळ्यांनी आगीच्या ज्वाळा पाहिल्या असून काहीही करून मायदेशात परतायचे आहे. भारतीय दुतावासातील लोक सातत्याने संपर्कात आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.

सर्व दुकाने बंद, विद्यार्थ्यांचे हाल

हल्ला झाल्यानंतर युक्रेनच्या राजधानीतील सर्व दुकाने बंद झाली आहेत. तेथील सरकारने विशिष्ट शिबीरेदेखील लावलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. खाण्यापिण्याच्या साहित्याचा तुटवडा आहे. आम्ही अगोदरपासूनच व्यवस्था केली होती व त्यातूनच भारतीय लोक इतर विद्यार्थ्यांची मदत करत आहेत. इंटरनेट सेवादेखील कधीही कोलमडू शकते, असे मुनेश्वर यांनी सांगितले.

टॅग्स :warयुद्ध