शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

‘सायबर क्राईम’चा ‘व्हायरस’ इलॉन मस्कच्या संपत्तीहून अधिक नुकसान करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 07:00 IST

Nagpur News २०३१ पर्यंत ‘सायबर क्राईम’मुळे जगभरातील आर्थिक नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता असून, केवळ ‘रॅन्समवेअर’मुळे दहा पटींहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअमेरिकेतील ‘सायबर’ संशोधन संस्थेचा अंदाज २०३१ पर्यंत दर दोन सेकंदाला ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून गंडा

योगेश पांडे

नागपूर :  ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात ‘सायबर क्राईम’चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असून, पुढील पाच वर्षांत याचे स्वरूप आणखी वाढण्याचा धोका आहे. २०३१ पर्यंत ‘सायबर क्राईम’मुळे जगभरातील आर्थिक नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता असून, केवळ ‘रॅन्समवेअर’मुळे दहा पटींहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील नऊ वर्षांत नुकसानाची आकडेवारी २६५ बिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीहून हा आकडा ४५ बिलियन डॉलर्सहून अधिक असून, यातूनच होणाऱ्या नुकसानाची गंभीरता लक्षात येते. अमेरिकेतील ‘सायबर सिक्युर व्हेंचर्स’ या संस्थेतर्फे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मागील काही काळापासून ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ गंडा घालण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यादृष्टीने केलेल्या संशोधनातून संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. २०१७ मध्ये ‘रॅन्समवेअर’मुळे जगाला ‘पाच बिलीयन डॉलर्सचे नुकसान झाले होते. २०२१ मध्ये यात चारपट वाढ झाली, तो सुमारे २० बिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचला. २०३१ मध्ये हा आर्थिक नुकसानाचा २६५ बिलीयन डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

२०२१ मध्ये प्रत्येक ११ सेकंदाला विविध ग्राहक, कंपन्यांवर ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून जाळे फेकण्यात आले. २०३१ पर्यंत दर दोन सेकंदाला ग्राहक किंवा व्यावसायिक आस्थापनांवर नवीन हल्ला होईल, असा अंदाज आहे.

सावध व्हा, क्रिप्टोक्राईम्सदेखील वाढणार

क्रिप्टोकरन्सीशी संबंधित असलेले क्रिप्टोक्राईम्सदेखील वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २०२१ मध्ये जगभरात क्रिप्टोक्राईम्समुळे १७.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. तो आकडा २०२५ मध्ये ३० अब्जांवर पोहोचण्याची शक्यता आहे. विविध क्रिप्टो ॲप्स तसेच क्रिप्टो लेंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढण्याचा अंदाज आहे.

१० टक्केच गुन्ह्यांची नोंद

संस्थेच्या संशोधनानुसार १० टक्केच सायबर गुन्ह्यांची पोलीस किंवा इतर यंत्रणांकडे तक्रार केली जाते. कागदोपत्री सायबर गुन्ह्यांची संख्या खूपच कमी दिसते व याचे कारण त्यांची नोंद होत नाही. संभ्रम, प्रतिष्ठेला हानी पोहोचण्याची भीती आदी कारणांमुळे या तक्रारींचे प्रमाण कमी आहे.

‘सायबर क्राईम’शी निगडित महत्त्वाचे अंदाज

- पुढील पाच वर्षांत जगभरात एकूण ‘सायबर क्राईम’ वाढेल व दर वर्षाला आर्थिक नुकसानाचा आकडा १५ टक्क्यांनी वाढत जाईल.

- डिजिटल ॲडच्या माध्यमातून लोकांना गंडविण्यावर भर असेल.

- विविध कंपन्यांमध्ये ‘सायबर’ सुरक्षेवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार

- सायबर विमा क्षेत्राचा विस्तार होणार. २०२१ च्या तुलनेत २०३१ पर्यंत सायबर विमा क्षेत्रातील आर्थिक उलाढाल चार पटींनी वाढणार

‘रॅन्समवेअर’ म्हणजे काय ?

‘रॅन्समवेअर’मध्ये सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुम्हाला खंडणीची मागणी करतो. संगणक हॅकिंग कुठल्याही माध्यमातून होऊ शकते. जर ठराविक मुदतीत रक्कम दिली नाही तर संगणक यंत्रणेतील सर्व डेटा ‘डिलिट’ करण्यात येईल, अशी धमकीच दिली जाते. अशी कामे करण्यासाठी ‘डार्क वेब’वर उपलब्ध असलेल्या विविध ‘रॅन्समवेअर सॉफ्टवेअर्स’चादेखील उपयोग करण्यात येतो.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम