शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी पत्नी कोठे आहे ?’ असे विचारून मुलगा-आईवर केला चाकूने वार

By दयानंद पाईकराव | Updated: February 15, 2024 19:54 IST

आरोपीस अटक : घरात घुसल्यामुळे हटकल्याने आरोपीचे कृत्य

दयानंद पाईकराव, नागपूर : पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे ती दुसऱ्याच्या घरात लपली असावी असा विचार करून आरोपी एका महिलेच्या घरात घुसला. महिलेने आणि तिच्या मुलाने हटकले असता आरोपीने दोघांवर चाकुने वार करून त्यांना जखमी केले. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी १३ फेब्रुवारीला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

दिनेश उर्फ भद्या शंकर आकोडे (३२, रा. भिमनगर एमआयडीसी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मोहिनी राजेश तिवारी (४५) आणि त्यांचा मुलगा रोहित तिवारी (२६) दोघे रा. वेशालीनगर हिंगणा रोड असे चाकुने वार केल्यामुळे जखमी झालेल्या महिला व तिच्या मुलाचे नाव आहे. आरोपी दिनेशचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. आरोपीचे नातेवाईक मोहिनी यांच्या घराजवळ राहत असल्यामुळे आपली पत्नी मोहिनीयांच्या घरी असल्याचा त्याला संशय आला. आरोपी मोहिनी यांच्या घरी आला. ‘माझे पत्नीसोबत भांडण झाले, ती घरून निघून गेली आहे, ती कुठे आहे ?’ अशी विचारना केली. मोहिन यांनी ‘माझ्या घरी आली नाही, मला माहिती नाही’ असे सांगितले.

त्यावर आरोपी मोहिनी यांच्या घराच्या वरच्या माळ्यावर गेला आणि घराची पाहणी केली. मोहिनी यांचा मुलगा रोहितने आरोपीला घरात काय पाहत आहे, असे विचारल्याने आरोपीने आपल्याजवळील चाकुने रोहितच्या पोटावर मारून त्यास जखमी केले. मुलाला चाकु मारत असल्याचे पाहून मोहिनी मुलाच्या बचावासाठी धावल्या असता आरोपीने मोहिनी यांच्या उजव्या हाताला चाकु मारून त्यांनाही जखमी केले. जखमी मोहिनी आणि रोहितला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी दिनेशविरुद्ध कलम ३२६, ३२३, ४५२, ५०४, १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी