शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सव्वालाख कोटींच्या खयवाडीचे टार्गेट ठेवून बुकींकडून सट्टाबाजार गरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 23:12 IST

निवडणूकीचा सट्टा सव्वालाख कोटींच्या घरात जाणार असल्याची चर्चा आहे.

नरेश डोंगरे, नागपूर : आयपीएल क्रिकेट सामन्याच्या सट्टेबाजीत मशगुल असल्याने लोकसभा निवडणूकीच्या सट्टेबाजीकडे दुर्लक्ष करणारे बुकी गुरुवारपासून खुलून मैदानात उतरले आहेत. एकीकडे वृत्त वाहिन्यांकडून एक्झिट पोल दाखविले जात असतानाच बुकींनी शुक्रवारी नवे रेट देऊन सट्टाबाजार गरम केला आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी निवडणूकीचा सट्टा सव्वालाख कोटींच्या घरात जाणार असल्याची चर्चा आहे.

कोट्यवधींची मलाई मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने देश-विदेशातील सट्टेबाजीसाठी पर्वणी ठरते. त्यामुळे यावेळी आयपीएलची घोषणा होताच देश-विदेशातील बुकींनी ७४ सामन्यांच्या माध्यमातून लाखो कोटींची खयवाडी केली. दरम्यान, आयपीएलमध्ये गुंतल्याने लोकसभा निवडणूकीच्या खयवाडीपासून अनेक बुकी दूर होते. मात्र, रविवारी आयपीएलचे फायनल झाले अन् लबालब झालेल्या बुकींनी चार-पाच दिवस 'रेस्ट झोन'मध्ये काढल्यानंतर गुरुवार-शुक्रवारपासून पुन्हा त्याच जोमाने डावबाजी सुरू केली. आज १ जूनला लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले असताना ४ जूनवर लक्ष केंद्रीत करून बुकींनी सट्टाबाजार चांगलाच गरम केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीवर ९७ हजार कोटींचा सट्टा लागल्याची चर्चा होती. यावेळी २०२४ ला बुकींनी सव्वालाख कोटींच्या सट्ट्याचे (खयवाडीचे) टार्गेट ठेवल्याची चर्चा आहे. फरक क्रिकेट अन् निवडणूकीच्या सट्टेबाजीचा

क्रिकेट सट्टा अन् निवडणूक सट्ट्यात खूप फरक आहे. क्रिकेटच्या सामनावर देश-विदेशात सट्टा लावला, खाल्ला जातो. त्यामुळे बुकी,पंटर आणि सट्टेबाजीत लागणारी रोकड प्रचंड मोठी असते. निवडणूकीचा सट्टा हा त्या-त्या विभागात, प्रांताशी संबंधित असल्याने खाणारे आणि लावणारे कमी असतात. रक्कमेचा आकडाही कमीच असतो. क्रिकेटच्या सट्टेबाजीत वेळ कमी अन् पैसा अधिक तर निवडणूकीच्या सट्टेबाजीत वेळ जास्त अन् पैसा कमी असतो.

तुमडी भरण्यासाठीच गेमबाजी

निवडणूकांच्या बाबतीत सटोड्यांची ही गेमबाजी केवळ त्यांची तुमडी भरण्यासाठीच असते. कारण त्यांच्याकडे दीड दोन महिन्यांचा अवधी असतो. त्यामुळे प्रारंभी ते भलतेच भाकित वर्तवितात. त्यानुसार,या भाकितावर सटोडे मोठा रकमेचा सट्टा लागतो. नंतर ते हळूहळू अंदाज बदलवून सट्टेबाजांची रोकड आपल्या तिजोरीत वळती करतात.सटोड्यांनी २०१९ मध्ये भाजपाला बहुमत मिळणार असे भाकित वर्तविले होते. आता २०२४ मध्येही सटोड्यांनी भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असाच अंदाज वर्तविला आहे. मात्र, निवडणूकीच्या पहिल्या आणि अंतिम टप्प्यातील सटोड्यांच्य गणितात खूप फरक (सटोडे त्याला कलर म्हणतात!) आला आहे. आता सटोडे चलबिचल अवस्थेत दिसत आहेत.

सट्टा बाजाराचा सध्याचा कलसंबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी सट्टा बाजाराने भाजपाला २५० सिटासाठी ६ पैसे (२५० सिटस् आल्या तर एक लाख रुपये लावणाराला ६ हजार रुपये मिळणार) भाव दिला आहे. २७५ सिटस् वर २० पैसे, ३०० सिट्सवर ५५ पैसे तर ३०६ सिट्सवर १ रुपया भाव दिला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर