शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 11:38 IST

रात्रीला हायवेवर धावणारे ट्रक ड्रायव्हर, ट्रॅव्हल, कारचालक यांच्यासाठी हे अतिशय उपयोगाचे डिव्हाईस ठरू शकते.

ठळक मुद्देरात्रीला होणारे अपघात टाळण्यासाठी ॲन्टी स्लीप अलार्मचे संशोधन

विशाल महाकाळकर

नागपूर : हायवेवर रात्रीला होणाऱ्या अपघातांची कारणमीमांसा केल्यावर लक्षात येते की, बहुतांश अपघातात चालकाला झोप लागली, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. अपघातापूर्वीच चालकाला झोप लागत असल्याचा अलर्ट मिळाल्यास अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी करण्यास मदत होईल. हा अलर्ट देणारे 'ॲन्टी स्लीप अलार्म' (anti sleep alarm) डिव्हाईस असून नागपुरातील एका युवकाने याचे संशोधन केले आहे.

गौरव सव्वालाखे असे या युवकाचे नाव आहे. हे डिव्हाईस इअर मशीनसारखे आहे. वाहन चालविताना कानाच्या मागल्या भागाला लावले जाते. या डिव्हाईसमध्ये त्याने एक सेन्सर लावले आहे. सोबतच ३.६ व्होल्टची बॅटरी व ऑन ऑफ स्वीच आहे. हे डिव्हाईस लावून गाडी चालवत असाल आणि तुम्हाला डुलकी लागली व तुमचे डोके ३० डिग्रीपर्यंत स्टेअरिंगच्या दिशेकडे खाली आले की डिव्हाईसमधून ८५ डेसिबल आवाजाचा अलार्म वाजायला लागतो. अलार्म वाजला की चालक लगेच अलर्ट होतो. कदाचित पुढचा धोका टाळू शकतो.

- अलार्म बरोबर व्हायब्रेट ही होणार

रात्रीला हायवेवर धावणारे ट्रक ड्रायव्हर, ट्रॅव्हल, कारचालक यांच्यासाठी हे अतिशय उपयोगाचे डिव्हाईस ठरू शकते. सध्या हे डिव्हाईस अलार्म देत आहे. यात काही बदल करून पुढे व्हायब्रेटरही होणार आहे. त्यामुळे आवाजाबरोबर शरीराला सुद्धा अलर्ट मिळणार आहे.

- नागपूर ते नेपाल कारने प्रवास करताना रात्रीला डुलकी लागल्याचे प्रसंग माझ्यासोबत घडले. तेव्हा विचार केला की झोप लागण्याचा अलर्ट देणारे यंत्र तयार करावे. तेव्हापासून त्यावर काम सुरू केले आणि ही ॲण्टी अलार्म मशीन तयार केली. सध्य मी याचा नाईट ड्राईव्ह करताना उपयोग करतो.

गौरव सव्वालाखे, संशोधक

टॅग्स :technologyतंत्रज्ञानroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात