शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

टीसीच्या सतर्कतेमुळे ‘तो’ सुखरूप आईच्या कुशीत पोहोचला

By नरेश डोंगरे | Updated: November 21, 2024 21:43 IST

युवकाकडून बालकाला फूस : बिलासपूरहून इंदूरला पळवून नेण्याचा प्रयत्न

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका युवकाने बालकाला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्तव्यावर असलेल्या टीसीच्या (तिकीट तपासणीस) सतर्कतेमुळे हा बालक सुखरूप त्याच्या आईच्या कुशीत पोहोचला.

पराग (नाव काल्पनिक, वय ११ वर्षे) हा बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला वडील नाही. त्याच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. आई खेळणी विकून कसेबसे कुटुंबीयांचे उदरभरण करते. समवयस्क मुला-मुलींना ज्या सुखसुविधा मिळतात, त्या आपल्याला मिळत नसल्याने पराग हिरमुसला होता. त्याची ती स्थिती हेरून एका युवकाने त्याला फूस लावून इंदूरला पळवून नेण्याचा कट रचला. त्यानुसार, परागला घेऊन तो युवक दोन दिवसांपूर्वी बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने इंदूरकडे निघाला. गाडीत मुख्य तिकीट निरीक्षक (सीटीआय) इंतेखाब आलम यांची नजर पडताच तो युवक गायब झाला.

एकटा पराग कावराबावरा दिसल्याने आलम यांनी त्याला जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली. त्याला चहा-नाश्ता करविला. प्राथमिक विचारपूस केली असता मुलाने घरची स्थिती ऐकवून आईला न सांगताच युवकासोबत पळून आल्याची माहिती दिली. हा चाइल्ड ट्रॅफिकिंगचा प्रकार असल्याचे लक्षात येताच आलम यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना कळवून मुलगा सुखरूप त्याच्या आईकडे पोहोचेल अशी व्यवस्थाही केली.अधिकाऱ्यांकडून सन्मान

कर्तव्यासोबतच सामाजिक दायित्वाची जाण बाळगणाऱ्या आलम यांच्या या कर्तृत्वाची माहिती कळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गाैरव केला. त्याच्या या कृतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे