शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताविनाच परतावे लागले १३ वर्षीय थॅलेसेमियाच्या मुलीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:40 IST

सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णाला मोफत रक्त देण्याचा नियम असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) थॅलेसेमियाच्या १३ वर्षीय मुलीला पीआरसी रक्त न मिळाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटल गाठावे लागले. या प्रकरणाला घेऊन शहर युवक काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाच्यावतीने अधिष्ठात्यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देमेडिकल : रक्तासाठी रुग्णांवर तासन्तास प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णाला मोफत रक्त देण्याचा नियम असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) थॅलेसेमियाच्या १३ वर्षीय मुलीला पीआरसी रक्त न मिळाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटल गाठावे लागले. या प्रकरणाला घेऊन शहर युवक काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाच्यावतीने अधिष्ठात्यांना निवेदन दिले. यात सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली.मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनपुरा येथील रहिवासी थॅलेसेमिया रुग्ण मनतशा अन्सारी (१३) सोमवारी सकाळी ९ वाजता मेडिकलमध्ये दाखल झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत तिच्या रक्ताच्या नमुन्याला कुणीच घेऊन गेले नाही. त्यानंतर नातेवाईकांनी जेव्हा डॉक्टरांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, आमच्याकडे अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान नाही. यामुळे जे रक्त उपलब्ध आहे त्यामुळे संक्रमणाची भीती आहे. शेवटी त्रासून रुग्णाचे नातेवाईक खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे भाषा बोलून निघून गेले. रक्तासाठी पाच तासांची प्रतीक्षासूत्रानुसार, याच वॉर्डात भरती असलेला रामटेक येथील रहिवासी कलश काकणे (६) दुपारी १२ वाजेपासून रक्त लावण्यासाठी आला होता. परंतु डॉक्टरांनी सायंकाळी रक्त मिळेल, असे सांगून त्याला बसवून ठेवले होते. तसेच मध्य प्रदेश चिखली येथील सिकलसेल रुग्ण श्रेनू भोंडेकर (५) याला सायंकाळी ५ वाजता रक्त मिळणार असल्याचे सांगून थांबवून ठेवले होते. या सर्व रुग्णांना ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताची गरज होती. रुग्णाच्या नातेवाईकानुसार, रक्तासाठी संपूर्ण दिवस वाट पाहिल्यानंतरही अनेकवेळा रक्त मिळत नाही. काहीवेळा तर आठवड्यानंतरची तारीख दिली जाते.अधिष्ठात्यांना दिले निवेदनसिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्त मिळत नसल्याच्या विरोधात शहर युवक काँग्रेसचे अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष फजलूर रहमान कुरेशी यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना निवेदन सादर केले. यात त्यांनी रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली.चौकशी केली जाईलसिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांनाच नाही तर इतर गंभीर रोगाच्या व शस्त्रक्रियेच्या रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. परंतु या प्रकरणात विना रक्त थॅलेसेमियाच्या रुग्णाला परत जावे लागले असेल तर याची चौकशी केली जाईल.-डॉ. संजय परातेविभागप्रमुख,रक्तपेढी मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य