शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसेमियाचे रुग्ण धोक्यात

By admin | Updated: May 9, 2017 02:01 IST

थॅलेसेमियाच्या रुग्णांना औषधांचा तुटवडा पडू देऊ नका, असे निर्देश खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे असताना मेयो, मेडिकलमध्ये या रोगावरील औषधांचा तुटवडा पडला आहे.

मेयो, मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा : केवळ सातच दिवसांचे दिले जात आहे औषधआज जागतिक थॅलेसेमिया दिनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थॅलेसेमियाच्या रुग्णांना औषधांचा तुटवडा पडू देऊ नका, असे निर्देश खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे असताना मेयो, मेडिकलमध्ये या रोगावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. महिनाभराचे औषध देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांची औषधे दिली जात आहे. गडचिरोली, गोंदियासह इतरही ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसत आहे, तर काही रुग्ण औषधांशिवाय राहण्याची शक्यता असून अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.आनुवंशिक अथवा काही ठराविक कारणांमुळे लहानपणापासून थॅलेसेमिया रोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ठराविक कालावधीत ‘ब्लडट्रान्समिशन’, चाचण्या अशी उपचार पद्धती असणाऱ्या या रोगाला नियमितपणे औषधे देणेही गरजेचे आहे. औषधांविना रुग्णाच्या यकृताला सूज येण्याची भीती असते. त्यामुळे थॅलेसेमिया बाधित रुग्णाला डेफ्रिजिट, डेसिरॉक्स किंवा असुनरा या गोळ्या घेणे अनिवार्य असते. मात्र ही औषधे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपलब्धच नाहीत. केवळ मेयो, मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. परंतु येथेही औषधांच्या तुटवड्याचे कारण पुढे करून कमी औषधे दिली जात असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक अडचणीत आले आहेत.गडचिरोली- नागपूर माराव्या लागतात चकरागडचिरोली येथून औषधांसाठी मेडिकलमध्ये आलेले दिलीप कौशिक म्हणाले, माझ्या १० वर्षाच्या मुलीला थॅलेसेमिया आहे. गडचिरोलीतील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात थॅलेसेमियाचे औषध मिळत नाही. बाहेर ही औषधे फार महागडी असल्याने विकत घेणे परवडत नाही. यामुळे मेडिकलमध्ये यावे लागते. यातही मुलीचे लोहाचे प्रमाण नेहमी वाढलेले असते. परिणामी, डॉक्टरांनी ४०० ग्रॅमचे ‘असुनरा’ हे औषध दोन वेळा घेण्यास सांगितले आहे. परंतु मेडिकलमध्ये ४०० ग्रॅमच्या पंधराच गोळ्या मिळतात. हे औषध सातच दिवस पुरते. यामुळे आठवड्यातून एकदा गडचिरोलीहून मेडिकलमध्ये यावे लागते. शिवाय, गडचिरोलीत रक्त चढविताना आवश्यक असलेले ‘ब्लड टेस्ट फिल्टर’ उपलब्ध होत नाही. गडचिरोली-नागपूर प्रवासात मोठा पैसा खर्च होतो. शिवाय रुग्णांचे हालही होतात. गडचिरोलीतच ही सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशाला ‘खो’पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या वर्षी थॅलेसेमियाच्या समस्यांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयो रुग्णालयाचे तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुनील लांजेवार, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे व थॅलेसेमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी उपस्थित होते. यात पालकमंत्र्यांनी बाहेरगावच्या रुग्णांना एक महिन्याचे औषध द्या असे स्पष्ट निर्देश दिले. परंतु आरोग्य विभागाच्या रुग्णालयात ही औषधे अद्यापही उपलब्धच झाली नाहीच, मेयो, मेडिकलमध्ये रुग्णांना केवळ पंधराच दिवसांचे तर काहींना केवळ सातच दिवसांचे औषध मिळत असल्याचे वास्तव आहे.