शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

थॅक्यू नागपूर! ईलेक्शन टू सिलेक्शन : कोणतीही अप्रिय घटना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:36 IST

उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले.

ठळक मुद्देसर्वांचीच समंजस भूमिका : चोख बंदोबस्त, पोलिसांनी घेतले अथक परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले. 

१८ मार्चपासून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. देशातील हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढत असल्यामुळे या लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते. त्यांना बंदोबस्तात तैनात करून गुंड तसेच अवैध दारू विक्री करणारे आणि धामधूम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला होता. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांंना पोलिसांनी आधीच सज्जड दम दिला होता. अवैध धंदेवाल्यांवर विशेष छापेमारीचे सत्र राबविले. त्यामुळे गुन्हेगारांनी, उपद्रवींनी गप्प राहण्यात धन्यता मानली.नेत्यांशीही संवाद।पोलिसांनी समाजकंटकांना गप्प केले असले तरी निवडणुकीचा प्रचार टोकाला असताना एका मनोरुग्णाने सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह नारे लिहून खळबळ उडवून दिली. दुसरीकडे काही जणांनी बेताल वक्तव्य करून तर काहींनी आक्षेपार्ह्य पोस्ट करून प्रचार प्रक्रिया तापविण्याचे प्रयत्न केले.भाषणातून आक्षेपार्र्ह्य वक्तव्य करून, सोशल मिडियावरून उलटसुलट पोस्ट करून वातावरण दुषित करू पाहणा-यांसोबत तसेच त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष बोलणी करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संवाद साधला. लोकशाहीच्या उत्सवाला कसेलही गालबोट लागणार नाही, याची आपण सर्वच काळजी घेऊ, असे त्यांना आवाहन केले. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी समंजस भूमीका घेतली. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले.मतमोजणीसाठी दोन दिवसांपूर्वीपासून पोलिसांनी बंदोबस्ताची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, खुपिया, वॉचर अशा सर्वांचाच बंदोबस्तासाठी नियोजनपूर्वक वापर करून घेण्यात आला. रखरखत्या उन्हात पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्यासह सर्वच पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांपासून तो पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत प्रत्येकांनी रात्रंदिवस बंदोबस्ताच्या निमित्ताने परिश्रम घेतले. त्यामुळे ईलेक्शन टू सिलेक्शन प्रक्रियेदरम्यान उपराजधानीत कुठलाही गडबड गोंधळ झाला नाही.नागपूरकरांनो धन्यवादनागपूरकर जनतेने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच शहरात अत्यंत चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली आणि तेवढ्याच शांततेत मतमोजणी पार पडली. निकालही आला. कुठे, कसलीच अनुचित घटना घडली नाही. यासाठी नागपूरकर जनतेला आपण मनापासून धन्यवाद देतो.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPoliceपोलिस