शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या कोराडी येथे १६९ हेक्टर परिसरात टेक्स्टाईल पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 20:21 IST

कोराडी परिसरातील महाजेनकोच्या अतिरिक्त १६९ हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीसंदर्भातील संपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी येत्या १५ दिवसात तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

ठळक मुद्देप्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी परिसरातील महाजेनकोच्या अतिरिक्त १६९ हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीसंदर्भातील संपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी येत्या १५ दिवसात तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.नागपूर सुधार प्रन्यासच्या सभागृहात टेक्स्टाईल पार्क संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए), महाजेनको, वस्त्रोद्योग संचालनालय व औद्योगिक विकास महामंडळ तसेच उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. कृष्णा खोपडे, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त व सभापती शितल उगले, वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे, महाजेनकोचे मुख्य अभियंता अभय हरणे, अनंत देवतारे, कार्यकारी संचालक शिरुडकर, महाजेनकोचे संचालक सुधीर पालिवाल, अधीक्षक अभियंता एस.एच. गुज्जेलवार, महाव्यवस्थापक अजय रामटेके आदी उपस्थित होते.महाजेनकोच्या कोराडी येथे अतिरिक्त १६९ हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्क उभारण्यासंदर्भात नागपूर महानगर विकास प्राधिकरण ही नोडल एजन्सी म्हणून राहणार असून टेक्स्टाईल पार्कसाठी लागणाºया सर्व सुविधा आदी बाबींची पूर्तता करून येत्या १५ दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, टेक्स्टाईल पार्कसंदर्भात वस्त्रोद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महाजेनकोच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक घेवून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधासंदर्भात महानगर आयुक्तांनी बैठक घेऊन संपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असेही या बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगितले.गांधीबाग परिसरातील व्यावसायिक तसेच उद्योजक यांना टेक्स्टाईल पार्क येथे जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच सर्व उद्योजकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील व एकाच ठिकाणी विविध उत्पादन तयार व्हावे, ही टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यामागची भूमिका असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र्र कुकरेजा यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेTextile Industryवस्त्रोद्योग