शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके

By admin | Updated: June 17, 2014 00:52 IST

जिह्यातील शाळा २६ जूनला सुरू होत आहे. शासकीय व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली जाणार आहे. या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण

जिल्हा परिषद : तालुका स्तरावर पुस्तके पोहचलीनागपूर : जिह्यातील शाळा २६ जूनला सुरू होत आहे. शासकीय व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली जाणार आहे. या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर पाठ्यपुस्तकासाठी विद्यार्र्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते. नियोजन करूनही वेळेवर पुस्तके मिळत नाही. याचा अभ्यासावर परिणाम होतो. ही बाब विचारात घेता यावेळी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच तालुका स्तरावर पुस्तके उपलब्ध केली आहेत. मुख्याध्यापकांना पुस्तकांचे वाटप सुरू असल्याची माहिती जि.प.च्या शिक्षण सभापती वंदना पाल यांनी दिली.सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३,९८,३९८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी २४,५३,४४३ पुस्तकांची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. यातील २२,८७,६५४ पुस्तके प्राप्त झाली आहेत तर १,६५७८९ पुस्तके शिल्लक आहेत. शासनाच्या धोरणानुसार शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली जातात. जिल्ह्यातील कोणताही विद्यार्थी यापासून वंचित राहू नये, असे निर्देश शिक्षण विभागाला दिल्याची माहिती पाल यांनी दिली.जि.प.च्या शिक्षण विभागाच्या मागणीनुसार ८५५२१४ स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत. पाठ्यपुस्तकासोबतच याचेही वाटप केले जाणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार विभागाने नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)