सीमेवर तणाव, संरक्षण मंत्री संघ भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:46 IST
केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन रा. स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. त्यांचा कुठलाही शासकीय कार्यक्रम नसताना त्या अचानकपणे नागपूर दौऱ्यावर आल्या. पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संघाशी सल्लामसलत करण्यासाठी त्या आल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविला जात आहे.
सीमेवर तणाव, संरक्षण मंत्री संघ भेटीला
ठळक मुद्दे निर्मला सीतारामन यांनी घेतली आरएसएसचे सरकार्यवाह भय्याजी जोशींची भेट