शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तणावामुळेही ‘इसब’ होऊ शकतो

By admin | Updated: September 26, 2014 01:15 IST

‘इसब’(एक्झिमा) होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वातावरणातील घटकांचा प्रादुर्भाव (साबण, डिटर्जंट, क्लोरिन आणि इतर त्रासकारक पदार्थ) काही अन्नपदार्थ (दूध, अंडी) लक्षणांना आणखी तीव्र करू शकतात.

युवकांमध्ये आढळतो हा रोग : जयेश मुखी यांची माहितीनागपूर : ‘इसब’(एक्झिमा) होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वातावरणातील घटकांचा प्रादुर्भाव (साबण, डिटर्जंट, क्लोरिन आणि इतर त्रासकारक पदार्थ) काही अन्नपदार्थ (दूध, अंडी) लक्षणांना आणखी तीव्र करू शकतात. तणाव हा देखील एक घटक आहे. कोरडे हवामान आणि कोरडी त्वचा हे सुद्धा त्याला आणखी तीव्र करण्यास कारणीभूत ठरतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्वचेला येणाऱ्या ओल्या व कोरड्या सुजेला ‘इसब ’ (एक्झिमा) असे म्हणतात. हा विकार पुष्कळ प्रमाणात अनुवांशिक व अनेकरूपी असतो. परंतु संसर्गजन्य नसतो. लहान बाळ आणि युवा मुलांमधे तो सहसा आढळतो. मेडिकलच्या त्वचारोग विभागाचे डॉ. जयेश मुखी यांनी सांगितले, इसबामुळे त्वचा लाल होते, कोरडी पडते आणि तिच्यावर लाल चट्टे येतात. उष्णता, तणाव किंवा खाजवण्यामुळे जखमा झाल्याने तेथील कंड अधिक वाढतो. इसबचे चट्टे हे गुडघ्यांच्या मागे, कोपरांचा कोन आणि मनगट, मानेवर, घोट्यांवर आणि पायांवर बऱ्याचदा उठतात. बालकांमधे हे चट्टे गालांवर पुरळ येण्याद्वारे सुरू झाल्याचे दिसून येते. काही महिन्यांनी हे पुरळ हातपायांवर येतात. इसब हा रोग दमा किवा उच्च ताप येण्याचा इतिहास असलेल्या लोकांमधे अधिक सहजपणे आढळतो. इसबाचा कौटुंबिक इतिहास, पिवळा ताप किंवा अन्य श्वसनाच्या अ‍ॅलर्जी असणाऱ्या लोकांमध्येदेखील इसबचे प्रमाण अधिक असते. इसब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वातावरणातील घटकांचा प्रादुर्भाव (साबण, डिटर्जंट, क्लोरिन आणि इतर त्रासकारक पदार्थ). काही अन्नपदार्थ लक्षणांना आणखी तीव्र करू शकतात (दूध, अंडी). तणाव हा देखील एक घटक आहे. कोरडे हवामान आणि कोरडी त्वचा हे सुद्धा त्याला आणखी तीव्र करण्यास कारणीभूत ठरतात. (प्रतिनिधी)