शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
4
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
5
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
6
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
7
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
8
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
9
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
10
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
11
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
12
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
13
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
14
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
15
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
17
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
18
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
19
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
20
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख

अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅडमिशन’चे ‘टेन्शन’;  मराठा आरक्षणामुळे थांबली प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:26 IST

सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत फक्त १३,४५४ प्रवेश 

मंगेश व्यवहारेनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशीरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. त्यापूर्वी अकरावीची पहिली फेरी आटोपली होती. त्यात शहरात १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षांनी कळविले होते की शासन स्तरावरून आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच आॅनलाईन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.अजूनही ४५,७१६ जागा रिक्तशहरात अकरावीच्या ५९,१७० जागा आहेत. ४०,९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३४,८७८ विद्यार्थ्यांनी भाग-१ भरला होता. २९,१५९ विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्म भरला होता. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानुसार अजूनही ४५,७१६ जागा रिक्त आहेत.- ग्रामीणमध्ये शिक्षण सुरू, शहरात शिक्षण थांबलेशहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येत आहे. तर ग्रामीण भागात मुख्याध्यापक स्तरावर प्रक्रिया असल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे. ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांमध्ये अकरावीचे आॅनलाईन शिक्षणही सुरू झाले आहे. पण शहरात प्रवेशच निश्चित झाले नसल्याने आॅनलाईन शिक्षणाला संधीच नाही. त्यामुळे अकरावीच्या शहरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे जास्त नुकसान आहे. कारण जेईई आणि नीटच्या परीक्षेमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो.वर्ग सुरू व्हायला डिसेंबर उजाडेलसप्टेंबरचा अर्धा महिना लोटला आहे. आता पहिली फेरी संपली. मराठा आरक्षणामुळे दुसऱ्या फेरीला स्थगिती दिली आहे. निर्णय झाल्यानंतर दुसरी फेरी होणार आहे. त्यानंतरही तिसरी आणि चौथी फेरी शिल्लक आहे. त्यामुळे किमान नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. कॉलेज सुरू व्हायला डिसेंबर उजाडणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्धे सत्र संपणार आहे. पण शिक्षण कसे देण्यात येईल, याबाबत कुठलेही दिशानिर्देश नाहीत.-डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र