लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील आहे.सुमित गुलाब बागडे (३३) असे आरोपीचे नाव आहे. दुसरा आरोपी अशोक माणिक खोब्रागडे (४५) याला पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. ही घटना १९ मे २०१५ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी १२ वर्षे वयाची होती. आरोपींनी तिला विविध आमिषे दाखवून पळवून नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशी पोलीस तक्रार होती. पोलीस उपनिरीक्षक शीतल हिरोडे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. माधुरी मोटघरे यांनी कामकाज पाहिले.
अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:08 IST
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे कारावास
ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : नागपूरच्या इमामवाडा हद्दीतील घटना