शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या दहा महिन्यात दहा खाणी

By admin | Updated: October 26, 2015 02:53 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडतर्फे (वेकोलि) दहाव्या महिन्यात नववी व दहावी खाण सुरू केली जात आहे. विशेष म्हणजे,

नवव्या व दहाव्या खाणीचा आजपासून शुभारंभ : ६.७५ मिलियन टन उत्पादन क्षमता नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडतर्फे (वेकोलि) दहाव्या महिन्यात नववी व दहावी खाण सुरू केली जात आहे. विशेष म्हणजे, कंपनीने मागील आठ महिन्यात आठ खाणी सुरू केल्या आहेत. यापूर्वी असे कधीही झाले नाही. आकडेवारी पाहता राष्ट्रीय कोळसा उत्पादनात वेकोलिची हिस्सेदारी ७.३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेकोलिने नवीन खाणी सुरू करून आपल्या उत्पादनक्षमतेत १४ मिलियन टनाची वृद्घी केली आहे. यासोबतच कंपनीने आपली उत्पादनक्षमता ४० मिलियन टनावरून ६० मिलियन टनापर्यंत वाढविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यातून कंपनीने तब्बल पाच वर्षानंतर कोळसा उत्पादन व विक्रीमध्ये सकारात्मक वृद्धी प्राप्त केली आहे. तसेच कंपनीला तीन वर्षानंतर प्रथमच ११६ कोटींचा करपूर्व नफा झाला आहे. सध्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील पाच जिल्ह्यात वेकोलिच्या एकूण ८३ खाणी आहेत. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश वीज उत्पादन प्रकल्पांना वेकोलितर्फे कोळसा पुरवठा केला जातो. याशिवाय मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेशातील शासकीय उपक्रम आणि इतर लघु उद्योगांनाही कोळसा दिला जातो. कंपनी नवीन खाणी सुरू करण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया वेगाने पार पाडत आहे.एवढेच नव्हे, तर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने इको-माईन्स टुरिझम पार्कसंबंधी जनजागृती केली जात आहे. तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून विविध सामाजिक उपक्रमही राबविले जात आहेत. यात स्वच्छ विद्यालय अभियान व तडाली येथील मल्टिस्पेशालिटी सेंट्रल हॉस्पिटलचा समावेश आहे. कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) राजीव रंजन मिश्र यांच्या मते, कंपनीने ही उपलब्धी आपल्या जुन्याच संसाधनांच्या बळावर प्राप्त केली असून कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह व परिश्रमाने हे शक्य झाले आहे. (प्रतिनिधी)दिनेश-यकोना आहेत नवीन खाणी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोलि) नवव्या व दहाव्या खाणींमध्ये दिनेश व यकोना या खाणींचा समावेश आहे. यापैकी दिनेश या खाणीची ४.० मिलियन टन व यकोना खाणीची २.७५ मिलियन टन क्षमता असून या खाणींचा सोमवारी २६ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता उमरेड क्षेत्रातील मकरधोकडा येथे केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कोळसा, वीज, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष गोयल आणि केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहतील.