शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लोडशेडिंगपासून तात्पुरता दिलासा; एनटीपीसी मदतीला, ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 08:45 IST

Nagpur News केंद्र सरकारची एनटीपीसी मदतीला आली असून महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून वीज कपात झालेली नाही.

कमल शर्मा

नागपूर : दहा वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा लाेडशेडिंगचे संकट निर्माण झाले आहे. परंतु सध्या तात्पुरता दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारची एनटीपीसी मदतीला आली असून महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून वीज कपात झालेली नाही. दरम्यान मागील पाच दिवसांपासून राज्यात कुठेही भारनियमन झाले नसून अखंडित वीज पुरवठा सुरू असल्याचा दावा महावितरणने केला आहे. या दोन्ही गोष्टी विचारात घेता नागरिकांना सध्यातरी लोडशेडिंग पासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्राकडून पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज केंद्रातील साठा काही दिवसांपुरताच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वीज केंद्र पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. १०,२१२ मेगावॉट क्षमतेच्या केंद्रातून केवळ ६,५२६ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे सोलापूर येथील बंद युनिटला सुरू करून एनटीपीसीने आता महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज द्यायला सुरुवात केली आहे. महावितरण सूत्रांचे म्हणणे आहे की, एक-दोन दिवसात एनटीपीसीचे आणखी एक युनिट सुरू होऊन ५०० मेगावॉट अधिकची वीज मिळू लागेल.

महावितरणच्या लोड व्यवस्थापनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनटीपीसीकडून मिळत असलेल्या अतिरिक्त विजेमुळे कोयनासह इतर हायड्रो प्रकल्पातून सध्या केवळ २९१ मेगावॉट विजेचे उत्पादन केले जात आहे. या प्रकल्पातील पाणी संकटाच्या काळासाठी वाचवून ठेवले जात आहे. त्यांनी सांगितले की, मागणी २७ हजार मेगावॉट वरून २३,१५० मेगावॉट वर आली असल्यानेही कंपनीला थोडा दिलासा मिळाला आहे.

- संकट कायम आहे

महावितरणसाठी अजूनही सकाळी व सायंकाळी ५ ते ८ वाजेची वेळ संकटाची ठरत आहे. कंपनीच्या सूत्रांनुसार या काळात सौर ऊर्जाचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे या काळात विजेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. मागणी वाढल्यावर जी-ग्रुप क्षेत्रात पुन्हा लोडशेडिंग करावी लागू शकते.

 

 

टॅग्स :electricityवीज