शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बृहत आराखडा म्हंजी काय रं भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:27 IST

राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ४ वर्षांनंतर बृहत् आराखडा तयार करण्याची आठवण आली आहे. यासाठी विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे बृहत् आराखडा नेमका काय आहे, का तयार करण्यात येत आहे, याची कुठलीही माहिती दिलेली नाही. थेट प्रतिक्रिया व सल्ले मागण्यात आले आहेत. बृहत् आराखडा म्हणजे काय असतो याचीच अनेक विद्यार्थी पालकांना माहिती नाही. अशा स्थितीत प्रशासनाची ही भूमिका पाहता बृहत् आराखड्याबाबत विद्यापीठ किती गंभीर आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : माहितीशिवायच मागण्यात येत आहेत बृहत् आराखड्यावर प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ४ वर्षांनंतर बृहत् आराखडा तयार करण्याची आठवण आली आहे. यासाठी विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे बृहत् आराखडा नेमका काय आहे, का तयार करण्यात येत आहे, याची कुठलीही माहिती दिलेली नाही. थेट प्रतिक्रिया व सल्ले मागण्यात आले आहेत. बृहत् आराखडा म्हणजे काय असतो याचीच अनेक विद्यार्थी पालकांना माहिती नाही. अशा स्थितीत प्रशासनाची ही भूमिका पाहता बृहत् आराखड्याबाबत विद्यापीठ किती गंभीर आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.बृहत् आराखडा नेमका काय असतो, त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश असतो हे विद्यार्थी-पालकांना सांगण्याची तसदीदेखील विद्यापीठाने घेतलेली नाही. यंदा प्रतिक्रिया ‘आॅनलाईन’ मागविण्यात आल्या आहेत. मात्र अनेक विद्यार्थी-पालक अद्यापही इंटरनेटपासून दूर आहेत. शिवाय विद्यापीठातीलच काही शिक्षक ‘आॅफलाईन’ आहेत. असा स्थितीत ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येतील कशा हादेखील प्रश्न आहेच.केंद्रदेखील बनविले नाहीतविद्यापीठ प्रशासनाने सर्वांना ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया नोंदविण्यास सांगितले आहे. मात्र यात काही तांत्रिक अडचण आली तर त्याचे निराकरण करण्यासाठी शहर तसेच ग्रामीण क्षेत्रांतील महाविद्यालयांत केंद्र तयार करण्यात आलेले नाहीत.चार वर्षांनंतर आली आठवणविद्यापीठाने २००८ साली पहिल्यांदाच बृहत् आराखडा तयार केला होता. या आराखड्यात विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराची स्वप्ने दाखविण्यात आली होती. मात्र नेमक्या किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने अजूनही दिलेली नाही. बृहत् आराखड्याच्या नावाखाली डोळे मिटून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाचा स्तर खालावताना दिसून येत आहे.हा असतो बृहत् आराखडायेणाऱ्या कालावधीत विद्यापीठाचा विकास नेमका कसा व्हावा, विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देण्यात येईल, कशाप्रकारचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील, कौशल्य विकासासाठी काय पावले उचलली जातील या बाबींचा बृहत् आराखड्यात समावेश असतो. सोबतच उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे, रोजगारासाठी प्रयत्न करणे, या बाबींना डोळ्यासमोर ठेवूनदेखील सर्वांच्या प्रतिक्रिया मागवून मग एक योजना तयार करण्यात येते. सर्वसमावेशक विकास असा उद्देश असलेली ही योजना दीर्घ कालावधीसाठी असते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर