शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

नागपुरात  सांड पकडताना पथकाची कसरत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 22:06 IST

सांडांना पकडण्यासाठी तामिळनाडूच्या पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गुरुवारी पथकाने सक्करदरा, ताजबाग व दिघोरी परिसरातील पाच मोकाट सांडांना पकडले.

ठळक मुद्देसक्करदरा भागातील पाच सांड पकडले : शहराच्या विविध भागातील सांडांच्या मुसक्या आवळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मोकाट सांडांना पकडण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने मोहीम हाती घेतली आहे. सांडांना पकडण्यासाठी तामिळनाडूच्या पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गुरुवारी पथकाने सक्करदरा, ताजबाग व दिघोरी परिसरातील पाच मोकाट सांडांना पकडले. ताजबाग परिसरातील सांडाला पकडताना तो बिथरल्याने परिसरातील लोकांना चांगलाच थरार बघायला मिळाला.गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास सांड पकडणारे पथक सक्करदरा परिसरात पोहचले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने सांड पकडण्याला सुरुवात केली. त्यानंतर ताजबाग, दिघोरी परिसरातील सांड जेरबंद करण्यात आले.गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मोकाट सांड पकडण्याची मोहीम सुरू आहे. बुधवारी मानकापूर भागातील मोकाट २२ जनावरे पकडली. यात सांडांचाही समावेश होता. कोंडवाडा विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोकाट गायी, म्हशींना पकडणे शक्य होते. परंतु सांडांना सहजासहजी पकडता येत नाही. सांड बिथरल्यास नुक सान होण्याचाही धोका असतो. याचा विचार करता तामिळनाडू येथील पथकाला शहरातील सांड पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. पथकात विशेष प्रशिक्षित १० लोकांचा समावेश आहे.मोकाट जनावरे व सांड पकडण्याला गोपालकांचा विरोध होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेच्या संबंधित झोन क्षेत्रातील पोलीस स्टेशनकडे बंदोबस्ताची मागणी केली जाते. परंतु नवरात्रोत्सव व विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याला अडचणी येत आहे.२०१३ मध्ये सांड पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी गोपालकांनी विरोध केल्याने मोहीम राबविणे शक्य झाले नव्हते. याचा विचार करता महापालिकेने यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले आहे. कोंडवाडा विभागाला गरजेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.नागपूर शहरात सुमारे २५० सांड आहेत. सांड पकडल्यास इतर जनावरांना नियंत्रण घालणे शक्य होईल. सांड पकडताना बिथरण्याची शक्यता गृहीत धरून या भागातील वाहतूक काही वेळ बंद ठेवावी लागणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांचीही मदत आवश्यक आहे. पकडलेले सांड शहरापासून दूरवर असलेल्या गोरक्षण केंद्रात ठेवणार असल्याची माहिती पशुचिकि त्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTamilnaduतामिळनाडू