शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्राचे पथक अचानक नागपूरची पाहणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:14 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर शहराची अचानक पाहणी करणार आहे. पाहणीसाठी पथक आपल्या मर्जीनुसार शहरातील स्थळांना भेटी देणार असल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१९ : १० तारखेनंतर पथक तपासणीसाठी येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर शहराची अचानक पाहणी करणार आहे. पाहणीसाठी पथक आपल्या मर्जीनुसार शहरातील स्थळांना भेटी देणार असल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.केंद्रीय पथकाचा दौरा गुप्त स्वरूपाचा राहणार आहे. महापालिका प्रशासनाला माहिती न देता पथक अचानक शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी येणार आहे तसेच शहरातील कुठल्या स्थळाची पाहणी करावयाची, हे पथकच ठरविणार आहे. त्यामुळे पथकाच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी ४ हजार गुण निश्चित करण्यात आले होते. २०१९ मध्ये ही स्पर्धा ५ हजार गुणांची आहे. यात शहरातील नागरिकांचा अभिप्राय, सेवा पातळी, प्रत्यक्ष निरीक्षण व केंद्रीयकरण यासाठी प्रत्येकी १२५० गुण ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेबाबतचा डेटा ऑनलाईन अपलोड केला आहे. त्यानुसार पथक आपल्या मर्जीनुसार शहरातातील स्थळांची निवड करून पाहणी करणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणात ४३४ शहरात नागपूर १३७ व्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळाला होता. नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक मिळाला नव्हता. परंतु ‘इनोव्हेशन अ‍ॅन्ड बेस्ट प्रॅक्टिस’ श्रेणीतील भारतातील सर्वोत्तम शहरात प्रथम स्थान मिळाले होते. स्पर्धेची तयारी केल्यानंतरही स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरला पहिल्या १० शहरात स्थान मिळाले नव्हते. याचा विचार करता यावेळी प्रशासनाने तयारी केली आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या सर्वेक्षणात नेमका कोणता अभिप्राय मिळतो, यावर क्रमांक ठरणार आहे.पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाची तयारीमहापालिका प्रशासनाने स्वच्छता सर्वेक्षणात आघाडी घेण्यासाठी शहरभर स्वागत कमानी, होर्डिंग्ज आणि गॅस बलून्स लावले आहेत. मात्र मुख्य रस्त्यांसह वस्त्यांची अस्वच्छतेची समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही. गेल्या वर्षी प्रशासनाने तयारी केल्यानंतरही स्वच्छता सर्वेक्षणात शहर माघारले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या दहाही झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना दुकानदार व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यात आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच दैनंदिन कचरा उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर