रामटेक : राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण २०२० वर आधारित कृतियुक्त शिक्षण कसे असावे, यावर मार्गदर्शन करण्यासाठी रामटेक शहरातील श्रीराम प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.
या कार्यशाळेत मराठी व गणित विषयाचे अध्यापन प्रशिक्षक तथा विद्या भारतीचे विदर्भ-देवगिरी प्रांत संघटनमंत्री शैलेया जाेशी यांनी इयत्ता पहिली व दुसरीला शिकवणाऱ्या शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्या भारतीचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर नवरे, मुख्याध्यापक मोहन काटोले, उषा गेडेकर, जयदेव डडोरे, कोसेकर, पाटील, सुधीर नांदेडकर, शुभम पोकळे उपस्थित होते. या कार्यशाळेत श्रीराम प्रायमरी शाळा रामटेक, श्रीराम उच्च प्राथमिक शाळा वाहिटोला, संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम प्रायमरी शाळेतील शिक्षक, शिक्षिका सहभागी झाल्या हाेत्या. मुख्याध्यापक जयदेव डडोरे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयाेजनाचा उद्देश विशद केला. संचालन अमोल गाडवे यांनी केले तर श्रद्धा चिमणकर यांनी आभार मानले.